आयसीएसई, आयएससी बोर्डाचे निकाल जाहीर:दहावीचे 99.09%, बारावीचे 99.02% विद्यार्थी उत्तीर्ण; फडणवीसांच्या मुलीला 92.60% गुण


भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने म्हणजेच CISCE ने आज 30 एप्रिल रोजी ISC आणि ICSE बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. आयसीएसई म्हणजेच दहावीमध्ये 99.09% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि आयएससी म्हणजेच बारावीमध्ये 99.02% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे निकाल सकाळी 11 वाजता बोर्ड कार्यालयात एकाच वेळी जाहीर करण्यात आले. बोर्डाने त्यांच्या अधिकृत वेबसाइट cisce.org वर ही माहिती प्रसिद्ध केली आहे. उमेदवार cisce.org वर जाऊन त्यांची गुणपत्रिका डाउनलोड करू शकतात. डिजिलॉकर अ‍ॅपच्या मदतीने मार्कशीट देखील डाउनलोड करता येते. यासाठी तुम्हाला तुमचा परीक्षा रोल नंबर आणि रोल कोड वापरून लॉगिन करावे लागेल. दिविजा फडणवीसला पडले 92.60% गुण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कन्या दिविजा फडणवीस हिलाही दहावीच्या परीक्षेत तब्बल 92.60 टक्के गुण पडले आहेत. अमृता फडणवीस यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला. आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय, आमची सुकन्या दिविजा ही 10 वी च्या बोर्ड परीक्षेत 92.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे, असे त्यांनी सांगितले आहे. डिजीलॉकरवर निकाल असा तपासा विद्यार्थ्यांना SMS द्वारेही निकाल पाहता येईल अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त, विद्यार्थ्यांना त्यांचा CISCE बोर्डाचा निकाल एसएमएसद्वारे पाहता येईल. विद्यार्थ्यांना त्यांचा ISC युनिक आयडी टाइप करावा लागेल आणि तो CISCE ने दिलेल्या 09248082883 या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर त्यांना तत्काळ त्यांच्या विषयवार गुणांसह एसएमएस निकाल मिळेल. मार्क्स इम्प्रुव्हमेंटसाठी जुलैमध्ये देता येईल परीक्षा ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारायचे आहेत त्यांना जुलै 2025 मध्ये कोणत्याही 2 विषयांच्या परीक्षेला बसता येईल. जे विद्यार्थी त्यांच्या निकालांवर पूर्णपणे समाधानी नाहीत ते त्या विषयांच्या उत्तरपत्रिका किंवा पेपर्सच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतील. उमेदवार CISCE ची अधिकृत वेबसाइट cisce.org ला भेट देऊ शकतात आणि मूल्यांकनासाठी अर्ज करण्यासाठी ‘सार्वजनिक सेवा’ या मेनू लिंकचा वापर करू शकतात. 3.5 लाख विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर आयएससी बारावीच्या परीक्षा 13 फेब्रुवारी ते 5 एप्रिल 2025 या कालावधीत झाल्या होत्या, तर आयसीएसई दहावीच्या परीक्षा 18 फेब्रुवारी ते 27 मार्च 2025 या कालावधीत झाल्या होत्या. बारावीच्या परीक्षेत 1.06 लाख विद्यार्थी बसले होते, तर दहावीच्या परीक्षेत 2.53 लाख विद्यार्थी बसले होते. दहावीत 33%, बारावीत 35% गुण परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी, विद्यार्थ्यांना ICSE मध्ये किमान 33% आणि ISC मध्ये किमान 35% गुण मिळवणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी किमान गुण मिळवू शकत नाहीत ते नंतर सुधारणा परीक्षेला बसू शकतात. गुणवत्ता यादी आणि टॉपर्स जाहीर केले जाणार नाहीत. गेल्या वर्षी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर झाली नव्हती. बोर्डाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते की, विद्यार्थ्यांमध्ये नाहक स्पर्धा होऊ नये म्हणून बोर्डाने गुणवत्ता यादी जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी देखील बोर्डाच्या परीक्षांनंतर गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार नाही. कोणत्याही टॉपरचे नाव देखील जाहीर केले जाणार नाही.

Leave a Comment