आळंद सह परिसरात असलेल्या विविध शासकीय कार्यालयांत बायोमेट्रिक यंत्रणा नसल्याने अधिकारी, कर्मचारी कधीही येतात व कधीही जातात. त्यामुळे आओ जावो घर तुम्हारा म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. काही ठराविक कर्मचारी उशिरा येऊनही रजिस्टरमध्ये लवकर आल्याची वेळ टाकतात. व वेळ टाकून लवकर निघून जातात याचा कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत आहे. कामानिमित्त आलेल्या नागरिकांना साहेब बाहेर आहेत, असे उत्तर ऐकावे लागत आहे.तर काही कर्मचारी तालुक्याचे काम सांगून वेळ काढत आहे. एकूणच ऐन उन्हाळ्यात रस्त्यावर शुकशुकाटाप्रमाणेच शासकीय कार्यालये देखील दुपारी बंद असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी वेळेत यावेत व वेळेत जावेत, यासाठी बायोमेट्रिक हजेरीची यंत्रणा बसविण्याची मागणी सध्या जोर धरत आहे. काही कार्यालय वगळता अजूनही अनेक कार्यालयांत ही यंत्रणा नाही. बायोमेट्रिक नसलेल्या कार्यालयात अनेक अधिकारी, कर्मचारी वेळेत येत नाहीत.ग्रामपंचायत, कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, तलाठी ऑफिस, पशुवैद्यकीय दवाखाना,बँक, महावितरण कार्यालय हे यासाठीचे उदाहरण आहे. जिल्हाधिकारी यांनी त्यांना वेळेत येण्याचे आदेश देऊनसुद्धा त्यांच्यावर फरक पडलेला दिसत नाही काही कर्मचारी वगळता अनेक कर्मचारी हे वेळेवर येत नसल्याचे चित्र आहे. आमच्या मुख्य शाखेत बायमॅट्रिकहि सुविधा उपलब्ध असून लवकरच तालुक्यातील इतर शाखेत सुद्धा बसविण्याची प्रक्रिया सुरु आहे.यामुळे कर्मचारी यांच्यावर वचक असेल -सुरेश कोलते, लोन ऑफिसर, जिल्हा मध्यवर्ती बँक या कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक नाही या कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी का नाही? पशु वैद्यकीय केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, महावितरण, जिल्हा मध्यवर्ती बँक, पोस्ट ऑफिस, सेवा संस्था कार्यालय, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, तलाठी ऑफिस या कार्यालयात बायोमेट्रिक मशीन नाही. या कार्यालयात अधिकारी आढळले नाही जिल्हा बँक : शाखाधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र : वैद्यकीय अधिकारी (दोन) इतर कर्मचारी गैरहजर पशु वैद्यकीय दवाखाना : कुलूप बंद वैद्यकीय अधिकारी गैरहजर महावितरण : अभियंता गैरहजर पोस्ट ऑफिस : कुलूप बंद
