केंद्र सरकारच्या वतीने जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्यासह केंद्र सरकारचे आभार मानले. जातीनिहाय जनगणना करण्याची राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची सन 1992 सालापासून मागणी मागणी होती. या मागणीला मोदी सरकारच्या निर्णयामुळे यश मिळाले असून केंद्र सरकारच्या वतीने जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. त्याबद्दल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन केंद्र सरकारचे आभार मानले. दरम्यान, जातीनिहाय जनगणनेमुळे यापुढे इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विमाप्र यांच्या करिता सर्वांगीण विकासासाठी धोरणे आणि योजना बनवण्याकरिता निधीचे नियोजन करता येणार आहे.अनुसूचित जाती अनुसूचित जमातींप्रमाणे इतर मागास प्रवर्गाला स्वतंत्र निधी मिळेल.शिक्षण,रोजगार,आरोग्य,निवारा या मुलभुत सुविधांचा शतकानुशतके वंचित राहिलेल्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती,भटक्या जमाती व विमाप्र यांना लाभ मिळेल. न्यायालयाला आवश्यक असलेली आकडेवारी सुद्धा त्यातून मिळेल त्यामुळे राजकीय आरक्षण सुद्धा पूर्ववत होईल, असेही छगन भुजबळ म्हणाले. अखिल भारतीय महात्मा फुले सक्त परिषदेच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर आज केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा जो ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे तो निर्णय इतर मागासवर्ग, विमुक्त जाती,भटक्या जमाती व विमाप्र या वंचित घटकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या जातीनिहाय जनगणनेनंतर देशातील आरक्षणाचा तसेच वंचित घटकांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे त्यामुळे या निर्णयाचे आपण स्वागत करत असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे विशेष आभार मानतो असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. हे ही वाचा… जातीनिहाय जनगणना जातव्यवस्था संपुष्टात आणण्याचे पाऊल:अजित पवारांचा विश्वास, तर एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर साधला निशाणा देशात सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातीनिहाय जनगणनेचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहे. तसेच हा निर्णय भविष्यात जातीव्यवस्था संपूर्णतः संपुष्टात आणण्यास मदत करणारा ठरेल, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून केंद्र सरकारचे आभार मानले आहे. यासोबतच या निर्णयावर काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसची‘सहन होत नाही, आणि सांगताही येत नाही’ अशी अवस्था होणार असल्याची टीका शिंदे यांनी केली. पूर्ण बातमी वाचा… जातीनिहाय जनगणनेची घोषणा निवडणुकीपुरती नसावी:केंद्रीय कॅबिनेटच्या निर्णयाचे सावध भूमिका घेत काँग्रेससह इतर पक्षांकडून स्वागत गेल्या काही वर्षांपासून देशभर चर्चेत असलेल्या जातीनिहाय जनगणनेबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या काळात जातीनिहाय जनगणना करण्यात येणार असल्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे जातीनिहाय जनगणनेसाठी सत्ताधाऱ्यांकडून विरोध केला जात होता. मात्र, आता देशात जातीय जनगणना करण्यात येणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. पूर्ण बातमी वाचा…
