रामलाल चौक परिसरात गौरीशंकर अपार्टमेंट गेल्या अनेक वर्षांपासून असताना त्यावर दवाखान्याचे आरक्षण टाकण्यात आले. रस्ता दहा मीटर रूंद असताना ड्रोनच्या चुकीमुळे आराखड्यात सहा मीटर दाखवण्यात आला आहे. हे सर्व मुद्दे घेऊन माजी नगरसेवक महापालिकेत आले होते. शहर विकास प्रारूप आराखड्यावरील हरकतींवर चार सदस्यीय समितीकडून दुसऱ्या टप्प्यातील सुनावणी सुरू झाली. माजी महापौर आरिफ शेख, संजय हेमगड्डी, माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी यांनी एकत्र येऊन तीन समस्या मांडल्या. फॉरेस्ट परिसरात ब्रिटीश काळापासून आजपर्यंत गावठाण लेआऊट असा उल्लेख आहे. गावठाण उल्लेख रद्द केले आहे. तो पूर्वी प्रमाणेच ठेवावा. या परिसरात एफएसआय वाढवून देणे गरजेचे आहे. यावर समितीने सांगितले की गावठाण रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच एफएसआय वाढवून देण्याचा अधिकार सुध्दा शासनाचा आहे. दोन्ही प्रस्ताव शासनाकडे पाठवून देण्यात येतील. या परिसरात १० मीटरचा रस्ता असताना सध्याच्या आराखड्यामध्ये सहा मीटरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यावर समितीने आपली चुक मान्य करीत ड्रोनमुळे असे झाले असून मात्र तो १० मीटरचाच रस्ता असल्याचे सांगण्यात आले. त्याशिवाय फॉरेस्ट परिसरात नाल्याच्या बाजूला आरक्षण टाकल्याचे लक्षात आणून देण्यात आले. २० वर्षांत बेघरांसाठी घरे बांधली नाही, आता बागेचे आरक्षण महापालिकेने वीस वर्षापूर्वी जे आरक्षण टाकले होते त्याचे विकास केले नाही आणि त्यावर पुन्हा आरक्षण टाकून आमचे वैयक्तिक विकास थांबवले जात आहे, असा आरोप तक्रारदारांनी केला. ३० एप्रिल रोजी ३०३ तक्रारदारांना बोलावण्यात आले होते. चेतन गोसकी यांची शेळगी परिसरात जागा आहे. त्या जागेवर वीस वर्षापूर्वी महापालिकेने बेघरांचे घर प्रकल्प बांधण्याचे आरक्षण टाकण्यात आले होते. गेल्या वीस वर्षात तेथे महापालिकेने काहीच विकास केला नाही. आता उद्यानाचे आरक्षण टाकले आहे. तर दशरथ कसबे यांची भवानी पेठ परिसरात जागा असून या जागेवर गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून लोक वास्त्वयास आहेत. असे असताना महापालिकेने पहिल्यांदाच या जागेवर इंडस्ट्रियल म्हणून आरक्षण टाकले आहे. राहत्या घरांच्या ठिकाणी औद्योगिक वापर म्हणून आरक्षण टाकल्यास घरे उध्वस्त होतील. अन्यथा जनआंदोलन केल्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नाही. त्यामुळे हे आरक्षण उठवा, अशी मागणी कसबे यांनी केली आहे. महापालिकेच्या ४ सदस्यीय समितीपुढे हरकतींवर सुनावणी देणे गरजेचे आहे. यावर समितीने सांगितले की गावठाण रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच एफएसआय वाढवून देण्याचा अधिकार सुध्दा शासनाचा आहे. दोन्ही प्रस्ताव शासनाकडे पाठवून देण्यात येतील. या परिसरात १० मीटरचा रस्ता असताना सध्याच्या आराखड्यामध्ये सहा मीटरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यावर समितीने आपली चुक मान्य करीत ड्रोनमुळे असे झाले असून मात्र तो १० मीटरचाच रस्ता असल्याचे सांगण्यात आले. त्याशिवाय फॉरेस्ट परिसरात नाल्याच्या बाजूला आरक्षण टाकल्याचे लक्षात आणून देण्यात आले. ५० वर्षांपासून अपार्टमेंट, त्यावर दवाखान्याचे आरक्षण काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे आणि माजी नगरसेविका मोहिनी पत्की यांनी रामलाल चौक परिसरातील गौरीशंकर गृहसंकुलाबाबत तक्रार आणली होती. यावेळी या संकुलचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. हे गृहसंकुल गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून अस्तित्वात आहे. असे असताना महापालिकेने सध्या विकास आराखड्या मध्ये खाजगी दवाखान्याचे आरक्षण टाकण्यात आले आहे. यास त्यांनी विरोध केला. समितीने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. आम्ही तुम्हाला कळवू, असे उत्तर दिले.
