जग झपाट्याने बदलत असून सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. विद्यार्थी दशेत शिक्षणाला महत्त्व आहे. परंतु अभ्यासाचे दडपण असेल तर त्याचा शरीरावर परिणाम होतो. मानसिक सुदृढतेसाठी शिक्षणाबरोबरच खेळांची आवड जोपासली पाहिजे. तरच तंदुरुस्त, खंबीर समाज निर्माण ह
.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित निगडी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने ‘युवोत्सव 2025’ या तीन दिवसांच्या क्रीडा स्पर्धेचा समारोप पारितोषिक वितरण समारंभाने झाला. यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, एस. बी. पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर उपस्थित होत्या.
दरम्यान स्पर्धेचे उद्घाटन गुरूवारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पिंपरी चिंचवड मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, आरजे अक्षय यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत फुटबॉल, बॉक्स क्रिकेट, बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. पुणे जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील एकूण १४५ संघ सहभागी झाले होते. या युवोत्सवात समन्वयक म्हणून प्रा. डॉ. काजल माहेश्वरी, डॉ. अनिषकुमार कारिया, डॉ. अमरीश पद्मा यांनी काम केले. माजी विद्यार्थी समन्वयक नंदलाल पारीक, विशाल निकम आणि अभिजीत नायडू यांचे सहाय्य लाभले.