अहिल्यानगर शिक्षण विभागाकडून राबवल्या जात असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे आता जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थी व पालकांचा कल वाढला आहे. पाच शाळांमध्ये एक कोटींचा खर्च करून ओपन सायन्स पार्कची उभारणी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टि
.
परिसरातील शाळांमधील विद्यार्थी शैक्षणिक सहलीने येऊन सायन्स पार्कला भेट देत आहेत. जिल्हा परिषद शाळेतील सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने यापूर्वी डिजिटल फळे शाळांना वाटप केले. तसेच लोकसहभागातून शाळांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्याच्या हेतूने, पाच शाळांमध्ये सायन्स पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रति पार्कसाठी वीस लाखांचा खर्च करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या स्व निधीतून प्रत्येक शाळेसाठी दहा लाख रुपयांचा निधी देण्यात आला.
तर उर्वरित दहा लाखांचा निधी लोकसहभाग तसेच ग्रामपंचायतकडून घेतला आहे. पाच सायन्स पार्क सुमारे एक कोटींचा खर्च झाला आहे. संवत्सर (कोपरगाव) सारोळा कासार (अहिल्यानगर) पानोली (पारनेर) काष्टी, कोळगाव (श्रीगोंदा) या जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. सायन्स पार्कमध्ये विविध विज्ञान उपकरणे, सौरमाला व त्यांचे कार्य याची माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
२२ प्रकारचे वैज्ञानिक साहित्य ओपन सायन्स पार्कमध्ये २२ प्रकारचे वैज्ञानिक साहित्य व उपकरणे ठेवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना या पार्कमध्ये रॉकेट, सूर्यमाला, आकाशगंगा, शास्त्रज्ञांची ओळख, पवनचक्की पाहायला मिळेल. त्याचबरोबर या उपकरणांचा प्रत्यक्ष वापर कसा केला जातो याचीही माहिती तेथे उपलब्ध आहे.