Seven people charged with obstruction of government work, case registered at Ahmedpur police station | शासकीय कामात अडथळा प्रकरणी सात जणांवर गुन्हा: अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎ – Ahmednagar News

तालुक्यातील रुद्धा- राळगा पाटी येथे तहसील कार्यालयातील वरिष्ठांच्या आदेशानुसार शासकीय कर्तव्य पार पाडत असताना, गैर कायद्याच्या मंडळींनी एकत्र येऊन शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना नुकतीच घडली.

.

सदरील प्रकरणी मंडळ अधिकारी विशाल कैचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, अहमदपूर तालुक्यातील रुद्धा-राळगा पाटी येथे दि २० फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयातील महसूल विभागाचे पथक उभे होते. या पथकात तहसीलदार उज्ज्वला पांगरकर, मंडळ अधिकारी कैचे, तलाठी संतोष खोमणे, तलाठी महेश गुपिले यांचा समावेश होता. यावेळी नांदेडकडून- अहमदपूरकडे वाळू वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर पथकाने कारवाई केली.

तहसील कार्यालयातील कर्मचारी शासकीय कर्तव्य पार पाडत असताना मंडळ अधिकारी कैचे यांनी एक हायवा अडवला होता. यावेळी सहा ते सात जणांनी एकत्र येऊन त्यास विरोध करत शासकीय कामात अडथळा आणला. याबाबत विशाल कैचे यांनी अहमदपूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मण वानखेडे व अन्य पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस हवालदार आरदवाड हे करीत आहेत.

Leave a Comment