माझ्या वडिलांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यामुळे त्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरुच राहणार असून आम्हा भावंडांच्या पाठीशी जनतेने उभे रहावे, असे भावनिक आवाहन मस्साजोग येथील सरपंच मयत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी शुक्रवारी ता.
.
वसमत येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांना जाहिर झालेला मरणोत्तर ‘राजा शिवछत्रपती समाजभूषण पुरस्कार’ कीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे (आळंदी देवाची), सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष तुषार पाटील जाधव म्हातारगावकर यांच्या हस्ते स्व.संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी आणि मुलगा विराज, संतोष देशमुख चे लहान बंधू धनंजय देशमुख यांनी स्विकारला.
यावेळी बोलतांना वैभवी देशमुख म्हणाल्या की, सदर पुरस्कार स्विकारावा किंवा नाही या द्विधा मनःस्थितीत आम्ही होतो. मात्र माझे वडिल सरपंच संतोष देशमुख यांनी गावासाठी मोठे काम केले असून गावासाठी अनेक पुरस्कार मिळविले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार स्विकारला असून हा पुरस्कार गावाला समर्पित करीत आहे. वडिलांच्या अनुपस्थितीत हा पु्रस्कार स्विकारतांना अतिशय वेदना होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
माझ्या वडिलांची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यांना न्याय मिळण्यासाठी उभा महाराष्ट्र संघर्ष करतो आहे. न्याय व्यवस्थेने आम्हाला न्याय द्यावा. माझ्या वडिलांना न्याय मिळे पर्यंत हा संघर्ष सुरुच राहणार आहेत. त्यासाठी तुम्ही आमच्या पाठीशी उभे रहावे असे भावनिक आवाहन करताच उपस्थितांच्या डोळ्यात आश्रू उभे राहिले.
डॉक्टर चांडकांना ‘माणसात देव शोधणारा माणूस’ पुरस्कार
यावेळी ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे किर्तन झाले. तसेच यावेळी वृक्षलागवड करून संवर्धन करणारे सह्याद्री देवराई टोकाई गड परिवारातील मंगेश दळवी, मंगेश इंगोले, किशोर फेदराम यांना ” झाडं माणूस” तर डॉ, चांडक परभणी यांना “माणसात देव शोधणारा माणूस” हा पुरस्कार देण्यात आला.