‘हम साथ-साथ हैं’ अशी परिस्थिती महाविकास आघाडीत दिसत नाही. ‘हम आपके हैं कौन?’ असे वातावरण तिथे दिसते. कारण महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला काँग्रेस नेते वेळेवर पोहोचले नाहीत. जेवणाच्या वेळी काँग्रेसचे नेते पोहोचले होते, अशी माहिती मला मिळा
.
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महायुती सरकारला लिहिलेल्या ९ पानांच्या पत्राचा संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या पत्रात एकूण ९ नेत्यांची नावे नमूद केली आहेत. त्यापैकी २ नेत्यांनी पत्रावर स्वाक्षरीही केलेली नाही. त्यात एक नाव आहे ज्याचा आम्ही शोध घेत आहोत की ते आमदार आहेत की नाहीत. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आपली नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार, नाना पटोले, जयंत पाटील यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित नव्हते. यावरून विरोधी पक्ष कसा काम करत आहे हे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आकडेवारी फिरवण्याचा प्रयत्न होणार : आव्हाड
सरकारचा हा अर्थ नसलेला अर्थसंकल्प अधिवेशन आहे. केलेल्या तरतुदी, दिलेला निधी व झालेला खर्च यांची सांगड घातल्यास हा ढोबळ अर्थसंकल्प असणार आहे. गेल्यावेळी ज्याप्रमाणे आकडेवारी फिरवून सांगण्याचा प्रयत्न केला तसाच प्रयत्न यंदाही होईल, अशी टीका शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी केली.
वाल्मीक कराडला तुरुंगात व्हीआयपी ट्रिटमेंट :दानवे
अंबादास दानवे म्हणाले, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराडला तुरुंगात व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी आढळून आले तरीही त्यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही, असेही दानवे यांनी या वेळी सांगितले.
१० मार्च रोजी सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प
सोमवारी आम्ही पुरवणी मागण्या मांडणार असून आणि १० मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. सरकारच्या विरोधात केवळ ५० आमदार असतानाही सरकार सभागृहात विरोधकांकडून उपस्थित केले जाणारे सर्व मुद्द्यांना उत्तरे देण्यास तयार आहे.
‘अजितदादांची खुर्ची फिक्स’, आमची बदलली
शिंदे म्हणाले, आमच्या दोघांच्या (एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस) खुर्चीची आदलाबदल झाली आहे. पण अजित पवारांची खुर्ची फिक्स आहे. अजित पवार म्हणाले, तुम्हाला खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, त्याला मी काय करू!. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,आमच्या सर्वांची रोटेटिंग चेयर आहे.
आघाडीत ‘हम आपके हैं कौन?’ सारखी परिस्थिती : फडणवीस
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, महिलांवरील वाढते अत्याचार, ढासळती कायदा सुव्यवस्था, कृषिमंत्र्यांकडून सरकारची फसवणूक, शेतकऱ्यांचे प्रश्न या विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे अधिवेशनात मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून विरोधकांकडून सरकारला घेरण्यात येणार आहे. अधिवेशनापूर्वीच रविवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यावेळी सत्ताधाऱ्यांकडून आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार घातला होता.
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी रविवारी दुपारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक उबाठाचे नेते अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीत संध्याकाळी सत्ताधाऱ्यांकडून आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. या आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, भास्कर जाधव, अमीन पटेल, भाई जगताप हजर होते.