वाशिंबे उजनी लाभक्षेत्र परिसरात मागील दहा वर्षांत केळी बागांचे क्षेत्र वाढते आहे. गेल्या पाच वर्षांत केळी क्षेत्रात निर्यातक्षम उत्पादनाचे क्षेत्र वाढते आहे. सुमारे पंचेवीस हजार हेक्टर क्षेत्रावर जी-नाइन केळीचे उत्पादन घेतले जात आहे. या केळीला पुणे,
.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस तसेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर व अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत ही उजनी लाभक्षेत्रातील गावे केळी उत्पादन व निर्यातीचे प्रमुख केंद्र बनली आहेत. करमाळा तालुक्यातील कंदर, वाशिंबे आणि माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे देशातील प्रमुख केळी निर्यातदार कंपन्यांनी या भागात आपली कार्यालये स्थापन केली आहेत. एखाद्या भौगोलिक प्रदेशातील वैशिष्ट्यांमुळे हवामान व संस्कृतीमुळे एखाद्या उत्पादनात, त्याच्या उत्पादन प्रक्रियेत अनेक वर्षे दर्जा, चव, रंग, वास उतरत असतील किंवा ते वर्षानुवर्षे कायम राहत असतील, तर अशा उत्पादनास भौगोलिक मानांकन असे म्हणतात, अशी शास्त्रीय व्याख्या केली जाते. भौगोलिक क्षेत्राशी निगडित उत्पादित मालास जीआय मानांकन मिळाल्यास कायदेशीर संरक्षण प्राप्त होते. भौगोलिक चिन्हांकनामुळे उत्पादनाच्या निर्यातीसाठी अधिक संधी उपलब्ध होतात. अशा नोंदणीकृत कृषी मालाची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँडींग होण्यास मदत होते. व्यापारी चिन्हाला बाजारपेठेत जे महत्त्व असते. तेच महत्त्व कृषी मालाच्या भौगोलिक चिन्हांकनासह असते. त्यामुळे अशी नोंदणी केलेल्या उत्पादनाच्या उत्पादकाला जास्तीचे आर्थिक उत्पन्न मिळून त्याच्या उन्नतीस हातभार लागतो. भौगोलिक मानांकन प्राप्तीमुळे भारतीय कृषी निर्यातीस जागतिक बाजारपेठेत निश्चितच लाभकारक ठरते. ^उजनी लाभक्षेत्रातील केळीला जीआय मानांकन प्राप्त व्हावे, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून जीआय मानांकनासाठी आवश्यक त्या कार्यालयाशी पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला जाईल. – धैर्यशील मोहिते पाटील, खासदार. कायदेशीर संरक्षण मिळाल्यास आंतरराष्ट्रीय निर्यातीसाठीची संधी उजनी लाभक्षेत्रातील नैसर्गिक परिस्थिती केळी उत्पादनासाठी अनुकूल असल्याने वर्षभर केळीची लागवड होते. महाराष्ट्रातून एकूण निर्यात होणाऱ्या केळी पैकी ६५ टक्के केळी येथूनच निर्यात होते. त्यामुळे भौगोलिक चिन्हांकन मिळणे आवश्यक आहे. कायदेशीर संरक्षण प्राप्त झाल्यास निर्यातीसाठी अधिक संधी उपलब्ध होईल. आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्पादन ब्रँडिंग होण्यास मदत होणार आहे. शेतक-यांना याचा फायदा होऊन अर्थिक उत्पन्न वाढण्यास हातभार लागेल. त्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. – धुळाभाऊ कोकरे, अध्यक्ष, द्रोपदी शेतकरी गट, कुगाव, ता. करमाळा केळीचे वैशिष्ट्ये वेगळे आहे. तसेच इथली नैसर्गिक परिस्थिती केळीस अनुकूल असल्याने येथे संपूर्ण वर्षभर केळीची लागवड आणि उत्पादन शक्य होऊ लागले. ‘उजनी ची’ केळी म्हणून इथल्या केळीला मानांकन मिळावे, अशी येथील शेतक-यांची मागणी आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पॅकिंग आणि आंतरराष्ट्रीय निकषांनुसार केळी उत्पादन केले जात असल्याने वाशिंबे, कंदर आणि टेंभुर्णी येथील केळी जागतिक स्तरावर पोहोचत आहेत.