जवळपास दोन महिन्यांपूर्वी किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले होते. त्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडले होते. आज ना उद्या भाजीपाला स्वस्त होईल, अशा प्रतीक्षेत ग्राहक होते. त्यांच्या प्रतिक्षेतील भाव कमी झाले असून सद्यस्थितीत बाजारात भाजीपाल्याची आ
.
जामनेर तालुक्यातील वाकोद येथे शनिवारी आठवडे बाजारात भाजीपाल्याचे दर कमी झाले. रब्बी हंगाम सुरू असल्याने ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात लागवड केलेला भाजीपाला निघाला. सगळीकडे एकाच वेळी भाजीपाल्याची आवक वाढली. महिन्यांपूर्वी लागवड केलेला भाजीपाला आला बाजारात भाजीपाल्याचे घसरले. स्वस्त झालेला भाजीपाला खरेदीसाठी आठवडे बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली आहे. भाजीपाला उत्पादकांना कमी दरामुळे उत्पन्नात घट होत असली तरी, भाजीपाल्याचे भाव कमी झाल्याने गृहिणींना मात्र दिलासा मिळाला आहे. आठवडे बाजारात ६० ते ८० रुपये किलोने भाजीपाला मिळत आहे. महिन्याभरापूर्वी २५० ते ३०० रुपयांचा भाजी घेऊनही पिशवी भरत नव्हती. आता १०० ते १५० रुपयांतच पिशवी भरत आहे.
सद्यस्थितीत कांद्याचे दर देखील झाले स्थिर मागील काही दिवसांत कांद्याच्या दरात वाढ झाल्याने उपाहारगृहातील पोहे, भजे, आलूवडा यांसह विविध पदार्थामधून कांदा गायब झाला होता. मात्र, सद्यःस्थितीत कांद्याचे दर स्थिर झाल्याने उपाहारगृहातील खाद्यपदार्थांना पुन्हा पारंपरिक चव मिळू लागली आहे.