सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात युजीसी – मालवीय मिशन शिक्षण प्रशिक्षण केंद्रामार्फत महाराष्ट्रातील प्राध्यापकांसाठी ‘भारतीय ज्ञान परंपरा’ बाबतचे सहा दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे
.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अग्रेसर असून भारतीय ज्ञान परंपरेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी आणि त्यासंबंधित कौशल्ये विकसित करण्यासाठीही पुढाकार घेत मोलाचे योगदान निश्चित देईल असे प्रतिपादन उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी यावेळी केले. भारतीय ज्ञान परंपरा हा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा विषय आहे. तो त्यांच्यापर्यंत परिणामकारकतेने पोहोचविण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची गरज असल्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत अशा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन सुरु करण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय ज्ञान परंपरेची वर्तमान परिस्थितीशी सांगड घालून समाजोपयोगी बदल करणेही अतिशय गरजेचे असल्याचे प्रा. मनिष जोशी यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले. या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. सुमन पांडे यांनी केले तर प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे यांनी आभार मानले.