नाशिकमध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याची सरकारकडून तयारी सुरू झाली आहे. कुंभमेळ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 3 हजार 345 कोटींचा आराखडा सादर केला आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या महंतांनी अजित पव
.
प्रयागराजमध्ये गर्दीचे अंदाज तुटलेले आहेत. अपेक्षेपेक्षा जास्त भाविक प्रयागराज येथील कुंभमेळ्यात येत आहेत. त्यामुळे नाशिकच्या कुंभमेळ्यातही मागील वेळेपेक्षा दुप्पट, तिप्पट किंवा त्यापेक्षा जास्त गर्दी वाढणार आहे. नाशिक येथील गोदावरी नदीचे पात्र छोटे आहे. आमच्याकडे जागा देखील छोटी आहे. त्यामुळे आम्हाला त्याठिकाणी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. याठिकाणी चेंगराचेंगरी होऊ नये किंवा इतर कोणता अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आम्हाला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे, असे गिरीश महाजन म्हणाले.
कुंभमेळ्याची खूप तयारी करायची आहे नाशिक येथील कुंभमेळ्याच्या तयारीच्या चर्चेसाठी बुधवारी दुपारी 12 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री, मी आणि सर्व विभागांचे प्रधान सचिव यांसह रेल्वे, विमान सेवेशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. कुंभमेळ्याची खूप तयारी करायची आहे. नाशिकच्या रेल्वे स्टेशनवर दोनच प्लॅटफॉर्म आहेत, त्यासाठी आणखी चार प्लॅटफॉर्म तयार करावे लागतील. दिल्लीत कशाप्रकारे गर्दी वाढली, हे आपण सगळ्यांनीच पाहिले. त्यामुळे नाशिकच्या कुंभमेळ्याची खूप तयारी करावी लागणार आहे. कुंभमेळासाठी लागणाऱ्या निधीबाबतही सर्व प्लॅनिंग उद्याच्या बैठकीत होईल, असे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
कुंभमेळ्यासाठी 3 हजार 345 कोटींचा आराखडा सादर नाशिकमध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याची सरकारकडून तयारी सुरू झाली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा देखील सादर केला आहे. 3 हजार 345 कोटींचा हा आरखडा आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती आणि आमदार हिरामण खोसकर यांनी अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. रस्ता रुंदीकरण आणि साधूसंतांच्या व्यवस्थेसाठीच्या तयारीबाबत यावेळी महंतांकडून अजित पवारांना सूचना करण्यात आल्या. महंतांच्या या सूचनांवर अजित पवार यांनीही सकारात्मकता दर्शवल्याची माहिती आहे.