Rajendra Nimbalkar appointed as director of Sarathi, who will be transferred where? | महाराष्ट्रात सात जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या: राजेंद्र निंबाळकर सारथीच्या संचालकपदावर, कोणाची बदली कुठे? – Mumbai News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या सतत होताना दिसत आहेत. आताही सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यात राजेंद्र निंबाळकर यांची सारथीच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर नियुक्ती कर

.

महाराष्ट्रातील एकूण सात जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

कोणाची बदली कुठे झाली?

1. राजेंद्र निंबाळकर (IAS:SCS:2007) व्यवस्थापकीय संचालक, MSSIDC, मुंबई यांची व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2. संजय यादव (IAS:SCS:2009) जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई यांची राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

3. डॉ. राजेंद्र भारुड (IAS:RR:2013) आयुक्त, TRTI, पुणे यांना प्रकल्प संचालक, RUSA, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

4. दीपक कुमार मीना (IAS:RR:2013) अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे यांची सहआयुक्त, राज्य कर, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

5. समीर कुर्तकोटी (IAS:SCS:2013) यांची आयुक्त, TRTI, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

6. महेश आव्हाड (IAS:SCS:2015) व्यवस्थापकीय संचालक, Haffkine Bio-pharma Corporation, Mumbai यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

7. कीर्ती किरण पुजार (IAS:RR:2018) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांची जिल्हाधिकारी, धाराशिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Comment