एकीकडे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये जात असल्याची तक्रार असतानाच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुक्यांसह सिंधुदुर्गमधील सेतू सुविधा केंद्र गुजराती कंपनी चालवणार असल्याचे समोर आले आहे. जिल्हा सेतू समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी
.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुकास्तरीय व एक जिल्हास्तरीय असे ९ सेतू सुविधा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) जिल्हाधिकारी कार्यालय, आणि तालुका देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग ही नागरी सुविधा केंद्रे चालवण्यासाठी गुजरात इन्फॉटेक लिमिटेड, अहमदाबाद या कंपनीला मंजूरी देण्यात आली आहे.
9 जानेवारी 2025 पासून ते 8 जानेवारी 2018 पर्यंत, म्हणजे पुढील तीन वर्षासाठीचे वर्क ऑर्डर गुजरात इन्फोटेक या गुजरातच्या कंपनीला देण्यात आली आहे. या कंपनीसोबत करार देखील करण्यात आला आहे. पण त्यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता असून ठाकरे गट आंदोलन करणार असल्याचे समजते.
दरम्यान, सेतू सुविधा केंद्र चालविताना भागधारक व महाऑनलाईन यांना राज्य सेतू सुविधा 1 रूपया, जिल्हा सेतू सुविधा 5 रूपये, महाऑनलाईन 4 रूपये तर गुजरात कंपनी निविदा धारक 10 रूपये वर्गीकरण करण्याला या कंपनीने स्विकृती दिली आहे असे या कार्यारंभ आदेशात जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी म्हटले आहे. या सेतू सुविधा केंद्रात 4 किंवा 5 कर्मचारी आहेत. जिल्ह्यातील 9 केंद्रात 40 कर्मचारी असतील, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे स्थानिक उद्योजकांवर अन्याय केला जात असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडी तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून सातत्याने महायुती विशेषतः भाजपवर आरोप केले जातात की महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातमध्ये नेले जात आहेत. आता तर गुजराती कंपनीसोबत महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रे चालवण्याचा करार केला आहे. यावरून ठाकरे गटाकडून आंदोलन केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.