महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मराठीतून शुभेच्छा:गौरवशाली इतिहास आणि जनतेच्या धैर्याचाही केला उल्लेख


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी मराठीतून या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या विकासात महाराष्ट्र कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये म्हटले आहे. एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून पोस्ट करत या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये त्यांनी या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचे धैर्य असे म्हणत महाराष्ट्राच्या इतिहासाची आठवण करून दिली आहे. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ असल्याचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर याबरोबरच आपल्या मुळाशीही घट्ट जोडलेले राज्य असून राज्याच्या प्रगतीसाठी माझ्या शुभेच्छा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. गुजरातला देखील गुजरातीमध्ये शुभेच्छा महाराष्ट्र बरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्याला देखील राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुजरातने आपल्या अद्वितीय संस्कृती, उद्योजकीय भावना आणि गतिमानतेमुळे एक वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राज्य प्रगतीच्या नवीन उंची गाठत राहो, या शुभेच्छा देखील मोदी यांनी दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी केलेली पोस्ट देखील वाचा… भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आलेल्या, महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो, तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचे धैर्य. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि त्याच वेळी आपल्या मूळाशीही घट्ट जोडलेले आहे. राज्याच्या प्रगतीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. शरद पवार, ठाकरे, पटोले, वडेट्टीवार मोदींचे अभिनंदन करणार का?:बावनकुळे यांचा सवाल; संकुचित मानसिकता असल्याचा आरोप केंद्र सरकारच्या वतीने जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यावरून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे. विरोधी पक्ष इतके दिवस जातीनिहाय जनगणना करा, म्हणून घसा कोरडा करणारे नेते आता केंद्रातील मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल अभिनंदन करण्याचे औदार्य दाखवणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पूर्ण बातमी वाचा….

Leave a Comment