जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारचा असला तरी त्याचे श्रेय राहुल गांधी यांचेच असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ‘सरकार मोदी की सिस्टिम राहुल गांधीकी’ अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या दहा वर्षांपासून राहुल गांधी हा मुद्दा मांडत असल्याचा दावा देखील त्यांनी केला. केंद्रात सरकार मोदींचे आणि सिस्टिम राहुल गांधींची चालू आहे. हे असेच चालत राहणार असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. आगामी काळात बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत. या सर्वांचा विचार करण्यासाठी सरकारला राहुल गांधी यांच्या विचारावर चालावे लागत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. सरकार राहुल गांधी यांच्या मागणी पुढे झुकले राहुल गांधी यांचे विचार देशातील शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचले आहेत. तसेच आगामी काळात बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत. त्यामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. सरकार राहुल गांधी यांच्या मागणी पुढे झुकले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मोदी सरकारने जरी निर्णय घेतला असला तरी त्याचे श्रेय राहुल गांधी यांनाच असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांची विचारधारा वेगळी देवेंद्र फडणवीस काय म्हणत आहेत, त्याकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता नाही. त्यांचे ऐकली जात नसल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय पातळीवरील गोष्ट लक्षात येत नाहीत. अनेक दिवसापासून जातीनिहाय जनगणनेवर राहुल गांधी बोलत आले आहेत. ज्या जातीचा जेवढा वाटा आहे, तेवढा हक्क त्यांना मिळायला पाहिजे. मात्र ही गोष्ट देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात येणार नाही. त्यांची विचारधारा वेगळी आहे. त्यांची विचारधारा जातीय जनगणनेमध्ये बसत नाही. हा बहुजन समाजाचा विषय आहे. त्यामुळे हे सर्व राहुल गांधी यांचेच श्रेय असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राहुल गांधींच्या भूमिके पुढे सरकारला गुडघे टेकावे लागले राहुल गांधींच्या भूमिके पुढे सरकारला गुडघे टेकावे लागले, अशा शब्दात संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ‘जिसकी जात का पता नही, हो जाती जनगणनेकी की बात कर रहे है’ अशा घाणेरड्या शब्दात अनुराग ठाकूर यांच्याकडून राहुल गांधी यांच्या मागणीवर टीका करण्यात आली होती. मात्र आता केंद्र सरकारने राहुल गांधी यांच्या भूमिकेनुसार निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी या निर्णयाचे स्वागत करतो आणि राहुल गांधी यांचे अभिनंदन करतो, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.
