महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय राजकारण नाही:मी आमदार झालो असतो तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते, शहाजीबापू पाटील यांचा दावा


गंगेचा उगम पवित्र आहे. कारण तिचा उगम शंकराच्या जटेतून झाला. तसा शिवसेनेचा उगम बाळासाहेब ठाकरेंपासून झाला. त्यामुळे ती ही पवित्र आहे. महाराष्ट्रात शिवसेना पक्षाशिवाय कोणतेही राजकारण होऊ शकत नाही, असा दावा ‘काय झाडी काय डोंगर’ फेम शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी गुरुवारी केला. मी आमदार झालो असतो तर एकनाथ शिंदे निश्चितच मुख्यमंत्री झाली असते, असेही ते यावेळी म्हणाले. शहाजीबापू पाटील म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय कोणतेही राजकारण होऊ शकत नाही. मी निवडून आलो असतो, एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री झाले असते. कारण, मी 1995 ला निवडून आलो. तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झालो. मी 2019 मध्ये निवडून आलो, तेव्हा उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानुसार मी 2024 मध्ये निवडून आलो असतो, तर एकनाथ शिंदे हे निश्चितपणे मुख्यमंत्री झाले असते. पण दुर्दैवाने मी पराभूत झालो. माझी रासच शिवसेनेची, पण… ते पुढे म्हणाले, मी रास शिवसेनेची आहे. पण मी पूर्वी काँग्रेसमध्ये कसा गेलो हे कळले नाही. राज्यातील लोक म्हणतात की, एकनाथ शिंदे यांच्यासारखा मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही. मागील 2 वर्षांत शिंदेंनी अपार कष्ट घेतले. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा न भूतो न भविष्यती असा निकाल लागला. शरद पवारांसारख्या माणसाचे केवळ 10 लोक निवडून आले. उद्धव ठाकरे यांच्या हाताला तर आयोडेक्स लावण्याची वेळ आली होती. पण त्यांनाही काही यश मिळाले नाही. उद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेनेची पिछेहाट शहाजीबापू पाटील यांनी यावेळी सोलापूरमधील शिवसेनेच्या पिछेहाटीवरही भाष्य केले. गंगा नदीचा उगम शंकराच्या जटेतून झाला. त्यामुळे ती अत्यंत पवित्र आहे. त्यानुसार शिवसेनेचा जन्मही बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून झाला. त्यामुळे शिवसेनाही पवित्र आहे. पण उद्धव ठाकरे यांच्या काळात शिवसेनेची पिछेहाट झाली. सोलापूर जिल्ह्यात पक्षाची सूत्रे दुसऱ्याकडे गेल्यामुळे पक्ष येथे मागे पडला, असे ते म्हणाले. हे ही वाचा… शत्रू भारताचे काहीही वाकडे करू शकत नाही:भेंडवळच्या घटमांडणीचे भविष्यवाणी समोर; यंदा भरपूर पावसाळा असल्याचाही वर्तवला अंदाज बुलढाणा – महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणाऱ्या भेंडवळच्या घटमांडणीची भविष्यवाणी आज समोर आली. त्यात यंदा भारताच्या शत्रूच्या कारवाया सुरूच राहतील, पण तो भारताचे काहीही वाकडे करू शकणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा जून महिन्यात सर्वसाधारण, जुलैमध्ये भरपूर, ऑगस्टमध्ये साधारण, तर सप्टेबर महिन्यात भरपूर पाऊस बरसणार असल्याचा अंदाजही यात व्यक्त करण्यात आला आहे. वाचा सविस्तर

Leave a Comment