राज्यात सध्या गुन्हेगारीत चांगलीच वाढली आहे. खून, अत्याचार अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात यवतमाळ शहर दुहेरी हत्याकांडाने हादरले आहे. कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करत निर्घृण खून केला आहे. तर दुसऱ्या घटनेत भांडणात मध्यस्थी केल्याने बेदम मारहाण करत जावयाची हत्या करण्यात आली आहे. या दोन्ही घटनांनी शहर हादरले आहे. भावाच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करत खून कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा डोक्यात रॉडने वार करत खून केला आहे. बालाजी मंगल कार्यालयाजवळ ही घटना घडली. प्रमोद पंढरीनाथ पेंदोर असे मृत तरुणाचे नाव आहे. तर कविश्वर पंढरी पेंदोर असे आरोपी लहान भावाचे नाव आहे. बालाजी मंगल कार्यालयाजवळ प्रमोद उभा होता. यावेळी लहान भाऊ कविश्वर तिथे आला. दोघांमध्ये कौटुंबिक कारणातून वाद झाला. त्यानंतर कविश्वरने लोखंडी रॉडने प्रमोदच्या डोक्यात आठ ते दहा प्रहार केले. यात प्रमोदचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. भांडणात मध्यस्थी केल्याने जावयाची हत्या दुसऱ्या घटनेत जावयाचा खून केल्याची घटना घडली आहे. शेरूचा 19 वर्षांपूर्वी राधिकासोबत प्रेमविवाह झाला होता. राधिकाची मावशी कविता आणि तिचा मुलगा नितीन यांच्यात कौटुंबिक वाद झाला. यावेळी वाद वाढू लागल्याने मध्यस्थी करण्यासाठी शेरू गेला असता, तू मध्ये का आलास? असे म्हणत नितीन व इतरांनी त्याला बेदम मारहाण केली. यात शेरूचा मृत्यू झाला. याप्रकरणी राधिकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
