महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत माझी२५ मिनिटे चर्चा झाली, पण भेटीत राजकीय हेतूनव्हता असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे(शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नांदेडयेथे सांगितले. हिंगोलीतीलकार्यक्रमासाठी ते २५ रोजी
.
सोमवारी सायंकाळी त्यांनीबावनकुळे यांच्या निवासस्थानीजाऊन भेट घेतली होती. याभेटीबाबत पाटील यांनी स्पष्टीकरणदिले. मी सांगली येथील महसूलच्याप्रश्नाबाबत भेट घेतली. या वेळी मंत्रीराधाकृष्ण विखे पाटील हेदेखीलहोते. पण, ही भेट राजकीय नव्हती,असे त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठस्वातंत्र्यसेनानी माणिकराव देशमुखटाकळगव्हाणकर यांच्याजन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्तआयोजित समारंभात ते बोलत होते.
दोन वर्षांत न्याय मिळावा
सरपंच देशमुख हत्याकांडातअद्यापपर्यंत चार्जशिट दाखल नाही,त्यामुळे वेळ लागला की आरोपीमोकळे होतात असा आरोप त्यांनीकेला. प्रकरणातील मुख्य आरोपीसुटल्याचे चार ते पाच वर्षांनी कळते.त्यामुळे न्यायालयातून दोन वर्षांतनिकाल लागला पाहिजे, अशीअपेक्षा त्यांनी व्यक्त केली.