Freestyle brawl among devotees at Ghrishneshwar temple, chaos as devotees enter VIP queue | घृष्णेश्वर मंदिरात भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी: भाविक व्हीआयपी रांगेत घुसल्याने गोंधळ – Chhatrapati Sambhajinagar News

महाशिवरात्रीनिमित्त वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दर्शन रांगेत पुढे जात असताना भाविकांमध्ये फ्रीस्टाईल मारामारी झाली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जात असताना हा सर्व प्रकार घडला आहे.

.

एक भाविक व्हीआयपी रांगेत घुसल्याने हा गोंधळ झाल्याने नियोजनाचा अभाव असल्याने हा प्रकार घडला म्हणत विरोधी पक्षनेत्यांनी नाराजी व्यक्त केजली आहे.

अंबादास दानवे म्हणाले की, मला घृष्णेश्वराची पूजा करण्याचा मान मिळाला मी स्वत:ला भाग्यवान समजतो. परंतू महाशिवरात्रीच्या वेळी संस्कृतीचे रक्षण करत आपली पताका मजबूतीने ठेवली आहे. हे बळ आमच्या मनगटात येऊ देत अशी प्रार्थना केल्याचेही यावेळी अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

Leave a Comment