शहरामध्ये महानगरपालिकेकडून हॉकर्स झोन निश्चित केलेले नाही. यामुळे रस्त्यावर लागणाऱ्या हातगाड्या मनपा प्रशासन उचलून नेत आहे. नागरी मित्रांकडून पथविक्रेत्यांवर दादागिरी करून शिवीगाळ केली जात आहे. शहरातील पथविक्रेत्यांंवर बेकायदेशीरपणे करण्यात येणारी का
.
या वेळी माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, मनपाने कायद्याच्या चौकटीत राहून इमानदारीने काम करावे. त्यामुळे आम्हाला आंदोलन करण्याची गरज पडणार नाही. मात्र मनपाकडून नेहमी दादागिरी केली जाते, तर ती आम्ही सहन करणार नाही. इम्तियाज जलील यांनी कायद्याच्या पुस्तकातील पथविक्रेत्यांसंदर्भा तील तरतुदी वाचून दाखविल्या. आंदोलनात माजी नगरसेवक नासेर सिद्दिकी, आरेफ हुसैनी, डॉ. कुणाल खरात, मोनिका मोरे, समीर साजीद बिल्डर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, पथविक्रेते सहभागी झाले होते.
२०१९ मध्ये शहरातील पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण केलेले आहे. सर्वेक्षणात १४ हजार ९८ पथविक्रेत्यांची जीओ टॅगिंग व बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंदणी करण्यात आली आहे. या सर्व पथविक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा देण्यात यावी. प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात यावे. महिलांना असभ्य भाषेत वागणूक दिली जात आहे. अशा नागरी मित्रांना सेवेतून बडतर्फ करावे. शासन निर्णय, परिपत्रक व आदेशाची अंमलबजावणी करून त्वरित हॉकर्स झोन तयार करावेत, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. मनपासमोर आंदोलन करताना पथविक्रेते, एमआयएमचे पदाधिकारी. हॉकर्स झोन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे.., पथविक्रेत्यांना परवाना मिळालाच पाहिजे. या मनपा प्रशासनाचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय, आदी घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच ठिय्या दिला. या वेळी उपस्थित पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली.
मनपासमोर जोरदार घोषणबाजी