3 people died in two separate accidents in Pune, two-wheeler accidents in Katraj and Loni Kalbhor | पुण्यात दोन वेगळ्या अपघातांत 3 जणांचा मृत्यू: कात्रज अन् लोणी काळभोर येथे दुचाकी भीषण अपघात – Pune News

कात्रज भागातील जांभुळवाडी रस्त्यावर भरधाव वेगात जात असलेली दुचाकी विद्युत खांबावर जोरात धडकून झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वारासह सहप्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.अपघातात दुचाकीस्वार दत्ता कल्याण चोरमले (रा. जांभुळवाडी, आंबेगाव), सहप्र

.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार चोरमले हे मंगळवारी मध्यरात्री बारावाजण्याच्या सुमारास जांभुळवाडी रस्त्याने भरधाव वेगात जात होते. त्यांच्याबरोबर मित्र श्रीकांत गुरव होता. गाथा स्विमिंग पूलजवळ दुचाकीस्वार चोरमले यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी विद्युत खांबावर आदळली. अपघातात दुचाकीस्वार चोरमले आणि सहप्रवासी गुरव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या चोमरले आणि गुरव यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान दोघांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे पुढील तपास करत आहेत. भरधाव वेगामुळे हा भीषण अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सोलापूर रस्त्यावर दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात घडली. अशोक तुकाराम शिंदे (वय 26, रा. साळोबा वस्ती, यवत, ता. दौंड, जि. पुणे) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध पोलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे.

याबाबत दुचाकीस्वार अशोक यांचे वडील तुकाराम सखाराम शिंदे (वय 49) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तुकाराम आणि त्यांची पत्नी जखमी झाले. दुचाकीस्वार अशोक, त्यांचे वडील तुकाराम आणि आई पुणे-सोलापूर रस्त्यावरून जात असताना, लोणी काळभोर परिसरातील राजलक्ष्मी लाॅनसमोर भरधाव वाहनाने दुचाकीस्वार अशोक यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. अपघातात अशोक यांचा मृत्यू झाला. त्यांचे वडील तुकाराम आणि आई जखमी झाले. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment