Rape in a bus in Pune, 5 am at Swargate station. 26-year-old girl raped in a Shivshahi bus, search for the accused caught in CCTV begins | पुण्यात बसमध्ये बलात्कार: स्वारगेट स्थानकात पहाटे 5 वा. 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार, सीसीटीव्हीमध्ये कैद आरोपीचा शोध सुरू – Pune News

पहाटे पाचच्या सुमारास तुरळक वर्दळ असलेल्या पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात एका नराधमाने २६ वर्षीय प्रवासी तरुणीवर शिवशाहीमध्ये बलात्कार केला. मंगळवारी पहाटे ही घटना घडली. पीडित तरुणीने लगेच काही तासांत तक्रारही दिली. मात्र पोलिसांनी प्रकरणाची चर्चा होऊ

.

आगारप्रमुखांची चौकशी

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्थानक प्रमुख तसेच आगाराचे प्रमुख यांनी प्रवाशांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केला काय? याबाबत चौकशीचे आदेश दिले. जर यात संबंधित अधिकारी दोषी आढळले तर तत्काळ निलंबित करावे असे निर्देश दिले आहेत. तसेच बसस्थानकावर कार्यरत सर्व २३ सुरक्षा रक्षक यांना तत्काळ बदलण्यात यावे, ७ दिवसांत चौकशी अहवाल सादर करावा, असे आदेश एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष विवेक भिमानवार यांना दिले.

सुरक्षा वाऱ्यावर : पाेलिसांची गस्त ठरली कुचकामी

बसस्थानकात पुरेशा सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे देखरेख नसल्याने चाेर, आराेपींचा वावर वाढला. आगारप्रमुखांच्या दुर्लक्षामुळे असे प्रकार हाेत आहेत का? सुरक्षा रक्षक व्यवस्था नावापुरती चालक ड्यूटी संपल्यानंतर बस लाॅक न करता कसे काय गेले? स्थानकात सराईत गुन्हेगार, आराेपींची पाेलिसांकडून तपासणी का केली जात नाही ? एसटी स्थानकावर पहाटे बसची उद‌्घोषणा व्यवस्था बंद तरुणी अंधारात लावलेल्या बसकडे अनाेळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून का गेली? दाेन दिवस आराेपीचा ठावठिकाणा का लागला नाही? पाेलिसांची गस्त कुचकामी बसस्थानकात दरराेज अश्लील चाळे सुरू असताना त्याकडे डाेळेझाक का केली जाते?

घटनाक्रम… अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवल्याने ‘घात’

मूळची फलटणची रहिवासी असलेल्या पीडित २६ वर्षीय तरुणीने याबाबत तक्रार दिली. ती पुण्यातील आैंध परिसरात एका रुग्णालयात समुपदेशक म्हणून काम करते. मंगळवारी पहाटे पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास ती गावी जाण्यासाठी स्वारगेट स्थानकात आली होती. ती बसची वाट पाहत होती. एकटी तरुणी असल्याचे हेरून आरेापी गाडेने तिला कुठे जायचे आहे? अशी विचारणा केली. तसेच ‘ताई, फलटणला जाणारी बस येथे लागत नाही, पलीकडे बाजूला जी बस लागलेली आहे ती जाते,’ अशी थाप मारली. मात्र सदर तरुणीने इथेच बस लागते, असे आत्मविश्वासाने सांगितले. मात्र गाडेने तिची पुन्हा दिशाभूल केली. ‘मी १० वर्षे इथे ये-जा करताे. तिकडे लागणारी बसच फलटणला जाते,’ असे पुन्हा सांगितले. त्यावर तरुणीने विश्वास ठेवला. मग गाडे तिला घेऊन पलीकडच्या बाजूस अंधारात उभ्या असलेल्या साेलापूर ते स्वारगेट या शिवशाही बसमध्ये (एमएच ०६ बीडब्ल्यू ०३१९) घेऊन गेला. अंधार असल्याने तरुणीने पुन्हा त्याला ‘हीच बस आहे ना?’ असे विचारले. त्यावर त्याने ‘ही बस सोलापूरला जाताना फलटणला थांबते’ असे सांगत माेबाइलचा टाॅर्च लावून बसमध्ये सीटवर बसण्यास सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणी बसमध्ये बसली. पाठोपाठ गाडेही बसमध्ये चढला. बसचा दरवाजा लावून घेत तिला धमकावून त्याने अत्याचार केला. घडलेला प्रकार काेणाला सांगू नकाे, अशी धमकी देत सुरुवातीला ताे एकटाच बसबाहेर पडला व निघून गेला. घाबरलेली तरुणी काही वेळ बसमध्येच होती. नंतर दुसऱ्या बसने फलटणला निघून गेली.

संताप : स्थानकात सुरक्षा रक्षकाच्या केबिनची तोडफोड

उद्धवसेनेचे वसंत माेरे यांनी बुधवारी बसस्थानकात सुरक्षा रक्षकाच्या केबिनची तोडफोड केली. ते म्हणाले, हे सुरक्षा रक्षक आरोपीच्या पाठीशी असल्याचे दिसून येते. येथील बंद बसमध्ये व परिसरात कंडाेम पाकीट, साड्या, अंतर्वस्त्रे पडली असून त्याकडे आगारप्रमुखांचे दुर्लक्ष आहे.’

मित्राने धीर दिल्यामुळे तक्रार

फलटणला बसमधून जाताना पीडित तरुणीने हा प्रकार मित्राला फोन करून सांगितला. तिला अश्रू आवरणे कठीण झाले होते. त्या वेळी मित्राने तिला धीर दिला. आराेपीविराेधात पाेलिसांकडे तक्रार दाखल कर असे सांगितले. त्यामुळे पीडित तरुणी अर्ध्या रस्त्यात उतरली व दुसऱ्या बसने पुन्हा पुण्यात आली. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास स्वारगेट पाेलिस ठाण्यात येऊन तिने फिर्याद दाखल केली. पाेलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन संबंधित एसटीची व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरेापी दिसून आला. पीडितेने त्याची ओळख पटवली. आरोपी दत्तात्र्य रामदास गाडे हा शिक्रापूरचा रहिवासी आहे.

Leave a Comment