Pune Swargate Bus Stand Rape Case Girl Medical Report | Pune Crime | Swargate Rape Case | स्वारगेट एसटी आगारात तरुणीवर एकदा नव्हे दोनदा बलात्कार: मेडिकल रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर, पीडितेवर उपचार सुरू – Pune News

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. आरोपीच्या शोधासाठी आठ पथके तैनात करण्यात आली असून तपास सुरू आहे. यादरम्यान पीडित तरुणीचा मेडिकल अहवाल समोर आला असून

.

पुण्यातील नेहमीच वर्दळ असणाऱ्या स्वारगेट बसस्थानकात मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास एक 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पुण्यात काम करणारी तरुणी फलटणला आपल्या गावी जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानकात आली होती. यावेळी आरोपी दत्तात्रय गाडे या नराधमाने एसटी आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार केले होते.

पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. यादरम्यान तिची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवाल रुग्णालयाने बुधवारी सायंकाळी पोलिसांना दिला. आरोपीने पीडितेवर एकदा नाही तर दोनवेळा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती या मेडिकल रिपोर्टमधून समोर आली आहे. सध्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अवघ्या 100 फुटांवर पोलिस चौकी, 18 सीसीटीव्ही, सुरक्षारक्षकांचा फौजफाटा असा सुरक्षेचा सरंजाम असताना, दत्तात्रय गाडे या नराधमाने पीडितेवर दोनवेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आरोपी गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी शिरूर व शिक्रापूर येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामिनावर सुटलेला आहे.

स्वारगेटमधील 23 सुरक्षारक्षक निलंबित परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्थानक प्रमुख तसेच आगाराचे प्रमुख यांनी प्रवाशांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केला काय? याबाबत चौकशीचे आदेश दिले. जर यात संबंधित अधिकारी दोषी आढळले तर तत्काळ निलंबित करावे असे निर्देश दिले आहेत. तसेच बसस्थानकावर कार्यरत सर्व 23 सुरक्षा रक्षक यांना तत्काळ बदलण्यात यावे, 7 दिवसांत चौकशी अहवाल सादर करावा, असे आदेश एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष विवेक भिमानवार यांना दिले.

कॅब ड्रायव्हरचे महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर समोर गैरवर्तन स्वारगेट परिसरात बस मध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आता पुण्यातील कल्याणी नगर परिसरात असलेल्या एका 20 वर्षीय कॅब ड्रायव्हरने महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर समोर गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर महिलेने कॅब मधून उडी मारली तसेच थेट पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. वास्तविक 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजताच ही घटना घडली आहे. मात्र, ती आता समोर आली आहे. पुण्यात काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत घडत असलेल्या घटनेमुळे याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा…

स्वारगेट बलात्कार प्रकरणाची इनसाइड स्टोरी:ताई, बस तिकडे लागली आहे, चल मी तुला घेऊन जातो असे म्हणत आरोपीने केला अत्याचार

पु्ण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. आरोपीची ओळख पटल्यामुळे त्याच्या कोणत्याही क्षणी मुसक्या आवळल्या जातील असा अंदाज आहे. त्यातच आरोपीने पीडित तरुणीशी ताई म्हणत अत्याचार केल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे. पूर्ण बातमी वाचा…

स्वारगेट बसस्टँडमधील बसचे चक्रावून टाकणारे PHOTO:बसमध्ये साड्या, अंतर्वस्त्र, कंडोम; येथे रोज रेप होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप

पु्ण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणी वसंत मोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करून बसस्थानकामधील सुरक्षा केबिनची तोडफोड केली. यावेळी मोरे यांनी बसमधील कंडोम्स व साड्यांचा खच दाखवत या ठिकाणी दररोज बलात्कार होत असल्याचा गंभीर आरोप केला. खाली पाहू बसमधील वस्तुस्थितीचे निवडक फोटो… पूर्ण बातमी वाचा…

Leave a Comment