स्वारगेट बसस्थानक परिसरात उभ्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. पोलिसांनी या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे याची कुंडली उघड केली आहे. त्यात त्याने झटपट पैसे कमावण्याच्या नादात चोरी व लुटमारीसारखे प्रकार के
.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी दत्तात्रय गाडेवर एका तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याचा आरोप आहे. तो एक सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी विविध पोलिस ठाण्यांत 7 गुन्हे दाखल आहेत. तो मूळचा शिरुर तालुक्यातील गुणाट गावचा आहे. 2019 मध्ये त्याने कर्जावर एक चारचाकी गाडी विकत घेतली होती. या गाडीतून तो पुणे ते अहिल्यानगर अशी प्रवासी वाहतूक करत होता. ही वाहतूक करताना त्याने चोरी करण्यास सुरुवात केली. तो वृद्ध महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवाचया व त्यानंतर निर्जन स्थळी नेत चाकूचा धाक दाखवून त्यांच्या दागिन्यांची लुबाडणूक करायचा. पण एका महिलेच्या सतर्कतेमुळे तो पकडला गेला.
झटपट पैसे कमावण्याचा होता नाद
एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, आरोपी दत्तात्रय गाडे (36) याच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेम आहे. गुणाट गावात त्याचे पक्क्या बांधकामातील पत्र्याचे घर आहे. त्याला 3 एकर वडिलोपार्जित शेती आहे. त्याचे आई-वडील शेतकाम करतात. त्याला एक भाऊ आहे. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आरोपीला पत्नी व लहान मुलेही आहेत. पण त्यानंतरही तो कोणताही कामधंदा करत नसे. तो कायम उनाडक्या करत फिरतो. त्याला झटपट पैसे कमावण्याचा नाद होता. त्यातून त्याने चोरी, लुटमारी करण्यास सुरुवात केली, अशी माहिती परिससरातील स्थानिक ग्रामस्थांनी दिली.
2020 मध्ये केला होता दरोड्याचा प्रयत्न
दत्तात्रय गाडेने गुणाट गावची तंटामुक्तीची निवडणूकही लढवली. पण त्याचा पराभव झाला. याशिवाय त्याने निवडणुकीच्या काळात एका राजकीय नेत्याचे काम केल्याचेही समोर आले आहे. त्याचे त्याच्यासोबतचे फोटो व्हायरलही झालेत. आरोपीने 2020 मध्ये शिरूर गावालगतच्या करे घाटात लूटमार केली होती. या प्रकरणी त्याच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्याला शिक्षाही झाली होती. शिक्रापूर येथे 2, अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा, केडगाव व कोतवाली पोलिस ठाण्यातही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. प या गुन्ह्यांचे खटले प्रलंबित असल्याने तो मोकाट फिरत होता.
दुसरीकडे, पोलिसांनी फरार दत्तात्रय गाडेचा ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने शोध सुरू केला आहे. तो ऊसाच्या शेतात लपल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पुणे शहर पोलिसांनी सदर शेतावर ड्रोनद्वारे टेहळणी केली. या ठिकाणी असलेल्या एका घरात आरोपीने पिण्यासाठी पाणी मागितल्याचीही माहिती आहे. त्याचे शेवटचे लोकेशन गुणाट गावात दिसल्याचेही समजते आहे. टीव्ही 9 मराठीच्या वृत्तानुसार, तो घटना घडली त्या दिवशी सकाळी 11 च्या सुमारास गुणाट गावातील आपल्या घरी आला. तिथे त्याने शर्ट बदलला. त्यानंतर सायंकाळी 5 च्या सुमारास गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला.
हे ही वाचा…
स्वारगेट बलात्कार प्रकरणाची इनसाइड स्टोरी:ताई, बस तिकडे लागली आहे, चल मी तुला घेऊन जातो असे म्हणत आरोपीने केला अत्याचार
पुणे – पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. आरोपीची ओळख पटल्यामुळे त्याच्या कोणत्याही क्षणी मुसक्या आवळल्या जातील असा अंदाज आहे. त्यातच आरोपीने पीडित तरुणीशी ताई म्हणत अत्याचार केल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे. वाचा सविस्तर
स्वारगेट डेपोतील ‘ती’ शिवशाही बस अज्ञातस्थळी हलवली:खबरदारी म्हणून कारवाई; पोलिसांना बसमध्ये दत्तात्रय गाडेचा बूट आढळला
स्वारगेट प्रकरणातील आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत फोटो:नेत्याचा फोटोही DP ला; आमदार कटकेंना पुढे येऊन करावा लागला खुलासा
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा तपास वेगवान:आरोपीचे संभाव्य लोकेशन मिळाले, लवकरच अटक होणार – गृहराज्यमंत्री कदम
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी फरार घोषित:दत्तात्रय गाडेबद्दल माहिती देणाऱ्यास 1 लाखाचे बक्षीस, पुणे पोलिसांची घोषणा