भारती विद्यापीठाच्या परिसरात गुंडांनी एका हॉटेलचालकाला बेदम मारहाण केली आणि जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या घटनेत हॉटेलचालक वाचला. पण त्याची दुचाकी जळून कोळसा झाली आहे. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री तथा गृह
.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कात्रज परिसरात ज्वलनशील पदार्थ टाकून एका व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेपूर्वी त्या व्यक्तीला एका टोळक्याने मारहाण केली होती. याबाबत त्याने पोलिसांना कळविले होते, तिथे पोलीस वेळेत पोहोचले असते तर, पुढील घटना टळली असती, असे त्यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळे यांचे ट्विट काय?
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुणे शहरात आजकाल गुंडांनी उच्छाद मांडलेला आहे. कात्रज परिसरात एका व्यक्तीला अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.या घटनेपूर्वी सदर व्यक्तीला एका टोळक्याने मारहाण केली होती. याबाबत पोलिसांना कळविले होते. तेथे पोलिस वेळेत पोहोचले असते तर पुढील घटना टळली असती. कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भाने गृहखात्याची यंत्रणा किती निष्काळजी आहे याचे हे उदाहरण आहे . माझी गृहमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा तातडीने आढावा घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावे.
नेमके काय घडले?
भारती विद्यापीठ परिसरात अमित खैरे यांची हॉटेल आहे. त्यांच्या हॉटेलबाहेर 15 ते 20 तरुणांचा वाद सुरू होता. तरुणांना आमच्या हॉटेल समोर भांडणे करू नका, असे सांगितले. पण संतापलेल्या या गुंडांना अमित खैरे याचे म्हणणे जिव्हारी लागले. त्यांनी खैरे यांना सिमेंटचा ब्लॉक फेकून मारला. त्यानंतर अमित खैरे हे भारती विद्यापीठाच्या पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेले. तक्रार देऊन ते रुग्णालयात जात असताना त्या गुन्हेगारांनी त्यांना रस्त्यात अडवले. त्यानंतर पुन्हा बाचाबाची करत मारहाण केली आणि बाटलीतून आणलेलं पेट्रोल त्यांच्या अंगावर टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करत होते. ते तरुण गुन्हेगारी वृत्तीचे असल्याने हॉटेलचालकाने दुचाकी तिथेच टाकून पळ काढला.