शिंदेसेनेचे सिल्लोडचे आमदार, शिंदेच्या मंत्रिमंडळातील माजी कृषिमंत्री अब्दुल सत्तारांच्या ओएसडींनी आर्थिक व्यवहार केला होता, असा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते, आमदार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केला. त्यांनी माजी मंत्री तानाजी सावं
.
फिक्सर आणि दलालांना यापुढे मंत्र्यांचे ओएसडी आणि स्वीय सहायक म्हणून काम करू देणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. त्याचे स्वागत मिटकरींनी केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की, मविआ सरकारच्या काळातील रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या ओएसडीने ५ कोटींच्या एका कामासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली होती. तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत, संजय राठोड आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तारांच्या ओएसडींचाही असाच अनुभव आला.
त्यामुळेच आज सत्तार, सावंत मंत्रिमंडळात नाहीत. सत्तार यांचे ओएसडी विवेक मोगल यांच्यावर गंभीर आरोप करत ते म्हणाले की, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर नेमलेल्या राज्यपाल नियुक्त नावांमध्ये मोगल यांनी आर्थिक व्यवहार केला. विदर्भाच्या विद्यापीठावर विदर्भाबाहेरचे प्रतिनिधी नेमले. आपल्या मतदारसंघात हजारो कोटींची विकासकामे केल्याचा दावा करणाऱ्या आमदारांना हा निधी कसा मिळतो हेही विचारा, असा टोलाही त्यांनी लगावला.