स्वारगेट एसटी बस स्थानक बलात्कार प्रकरणतील आरोपी दत्तात्रेय गाडे याला मध्यरात्री गुनाट अटक करण्यात आली आहे. गावकऱ्यांनी दत्ता गाडे याला पकडून देण्यासाठी मदत केली. गावकऱ्यांनी केलेल्या या मदतीमुळे दत्ता गाडेच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले, यामु
.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, गाडेला पकडून देणाऱ्या व्यक्तींचा पोलिसाकडून सत्कार करण्यात येईल, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. ज्या व्यक्ती शेवटी माहिती दिली त्यांना 1 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
अमितेश कुमार म्हणाले की, शहरातही महिला सुरक्षा आढावा घेण्यात आला आहे. शहरातील विविध भागातील सेफ्टी ऑडिट घेतले जात आहे. मनपा सोबत एकदा पुन्हा डार्क स्पॉट जागी लाईट खांब लावून गस्त वाढविण्यात येईल. महिला सुरक्षा बाबत सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात येईल. तपास उशिरा लागला असला तरी तक्रार आल्यावर याबाबत तपास तातडीने सुरू करण्यात आला. आरोपी बाबत सीसीटीव्ही तपासणी करून त्याची ओळख पटविण्यात आली. ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणात पोलिसांना सहकार्य केले आहे त्यामुळे स्वतः मी गावात जाऊन त्यांचा सन्मान करणार आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहे आणि या गुन्ह्यात आरोपीला कडक शिक्षा करण्याबाबत पोलिस प्रयत्नशील राहतील.
भूक लागल्याने नातेवाईकांच्या घरी गेला अन् पकडला
स्वारगेट येथील तरुणीवर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे गेल्या दोन दिवसापासून शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील उसात लपून बसला होता. पोलिसांनी गुनाट गावात जवळपास 50 तास ऑपरेशन राबवले. मात्र तो सापडला नव्हता. अखेर भूक लागल्याने रात्री बाराच्या सुमारास तो गावातील एका नातेवाईकांच्या घरी गेला. तिथे त्याने मला प्रचंड भूक लागली असून काहीतरी खायला द्या, अशी मागणी केली. त्यानंतर नातेवाइकांनी त्याला खायला आणि पाण्याची बाटली दिली. त्याचवेळी दत्तात्रय गाडेने आपल्याला पश्चात्ताप झाला आहे, असे नातेवाईकांना सांगितले. तसेच जे काही केले ते चुकीचे आहे. मला पोलिसांना सरेंडर व्हायचंय, असे देखील तो म्हणाला. त्यानंतर पाण्याची बाटली घेऊन तो निघून गेला. त्याचवेळी नातेवाइकांनी पोलिसांना गाडे आल्याची माहिती दिली आणि त्यानंतर तो लगेचच पोलिसांना सापडला.