Accused Dattatreya Gade appeared in Shivajinagar court | स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी: आरोपीच्या वकिलाचा दावा- संमतीने शारीरिक संबंध – Pune News

पुण्याच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली असून त्याला पुणे कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी दोन्ही बाजुची सुनावणी पार पडली व न्यायाधीश टी.एस. गायगोले यांनी आरोपीला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दोघांमध्ये सं

.

पिडीतेवर आरोपीने दोनवेळा बलात्कार केला. तसेच तिला आपण बसचा वाहक असल्याचे सांगीतले होते, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली असून १४ दिवसांची पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. तसेच आरोपीवर ६ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीने अनेकवेळा आपण पोलिस असल्याचे सांगत तरुण मुलींना फसवण्याचा प्रयत्न केला आहे. विकृतीमधूनच आरोपी हा ऐवज हेरण्याचा प्रयत्न करायचा. तसेच आरोपी दत्तात्रय गाडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली.

आरोपी दत्तात्रय गाडे फरार असताना त्याने शेतात आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला असल्याचे समजते. मात्र गळफास घेतलेला दोर तुटल्याने जीव वाचला. आत्महत्या करण्याचे साहित्य देखील घटनास्थळी सापडले आहेत. या संदर्भातील माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच ज्यांच्या मदतीने आरोपी मिळाला त्यांना 1 लाखांचे बक्षीस देणार असल्याचे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांचा जमाव पाहायला मिळाला. मात्र, पोलिसांनी या महिलांना आरोपीच्या सुरक्षेसाठी ताब्यात घेतले. यावरून पुन्हा महिला आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आरोपीची सुरक्षा महत्त्वाची आणि आमच्या सुरक्षेचे काय? असा सवाल देखील यावेळी महिलांनी उपस्थित केला.

आरोपी दत्तात्रय गाडेला सध्या शिवाजीनगर कोर्टात हजर करताना कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आरोपीला ज्या वाहनातून घेऊन आणले त्या वाहनाच्या मागेपुढे पोलिस अधिकाऱ्यांच्या गाड्या होत्या.

Leave a Comment