तालुका पंचायत समितीची आमसभा तब्बल ८ वर्षांनी झाली. विशेष म्हणजे चारही विधानसभा मतदारसंघाचे आमदार उपस्थित असलेल्या या आमसभेला बहुतेक सर्व विभाग प्रमुखांनी दांडी मारली. कनिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरांनी ना आमदारांचे समाधान झाले ना सामान्य नागरिकां
.
सुरुवातीला राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीतानंतर दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आ अभिजित पाटील या आमसभेच्या अध्यक्षस्थानी होते. तर आ. समाधान आवताडे, आ. राजू खरे, आ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह गटविकास अधिकारी सुशील संसारे, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत जाधव, तहसीलदार सचिन लंगुटे आदींसह हजारो ग्रामस्थ उपस्थित होते. यापूर्वी २०१७ साली झालेल्या आमसभेचे इतिवृत्त वाचून गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी पंचायत समितीच्या कामकाजाचा आढावा मांडला.
यानंतर पाटबंधारे विभाग, पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी आपापल्या विभागाचा आढावा मांडला. पंढरपूर नगरपालिकेच्या कारभाराविषयी शहरातील नागरिकांनी जोरदार आक्षेप घेतले. शहरातील सांडपाणी चंद्रभागेला मिसळते, शहरातील उद्याने ओसाड झालेली बहुतेक सर्वच विभागांचे प्रमुख अधिकारी आमसभेची सूचना अगोदर देऊनही परवानगी न घेताच गैरहजर राहिल्याचे दिसून आले. सर्वच विभागांचे कनिष्ठ अधिकारी सभेला आले होते आणि उत्तरे देताना त्यांची तारांबळ उडत होती. आमदारांच्या शंकांचे समाधान होत नव्हते आणि नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांच्याकडे उत्तरे नव्हती. अखेरीस आमदार खरे, देशमुख यांनी आमसभेला गैर हजर राहिलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करणारा ठराव करा, अशी सूचना केली. आहेत, १३ रस्त्यांचे काम निकृष्ट झालेले आहे, प्रधानमंत्री आवास योजना का रखडली आहे, चंद्रभागा वाळवंटातून होणंही वाळू चोरी, नामसंकीर्तन सभागृह आदी विषयावरून नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी परिचारक समर्थक कार्यकर्त्यांनी काही विषयांवर आक्षेप घेतल्याने सभेला परिचारक समर्थक आणि परिचारक विरोधक असे स्वरूप आले होते. मात्र सभेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी हस्तक्षेप करीत सर्व कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भूमी अभिलेख या विषयांवर जोरदार चर्चा झाली. नागरिकांनी कामे वेळेवर होत नाहीत इथपासून ते अधिकाऱ्यांची नावे घेऊन लाचखोरीचे थेट आरोप केले. सायंकाळी उशिरापर्यंत आमसभा सुरूच होती. तब्बल सहा तासानंतरही हजारो नागरिक सभेला ठिय्या मारून बसले होते. रात्रभर सभा चालली तरी हरकत नाही, मात्र सर्व विषयांवर चर्चा होईल, असे सभेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले.
कनिष्ठ अधिकाऱ्यांची उत्तर देताना तारांबळ
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी महावितरण कडून स्मार्ट मीटर आणि प्रीपेड मीटर्स बाबत सक्ती केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. हे दोन्ही मीटर्स सक्तीचे नकोत अशी मागणी करणारा ठराव घ्यावा, अशी सूचना मांडली तर आ.बाबासाहेब देशमुख यांनी त्यास अनुमती दिली आणि उपस्थितांनी टाळ्या वाजवून मंजुरी दिली.