शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. दोन मर्सडिज दिल्या की एक पद मिळते, असे विधान नीलम गोऱ्हे यांनी केले होते. यावरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मि
.
संजय राऊत यांच्याकडील गाड्या कोणाच्या नावावर – संजय शिरसाट
शिवसेना ठाकरे गट व शिवसेना शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय शिरसाट म्हणाले, संजय राऊत यांच्याकडील गाड्या कोणाच्या नावावर आहेत, ते त्यांनी सांगावे. जास्त बोलायला लाऊ नका, झाकली मूठ सव्वालाखाची ठेवा. कोणी कोणी गाड्या दिल्या, कोणी काय काय दिले हे जर एक एक जण बोलायला लागले तर दिवस पुरणार नाही, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे. याला ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
माझ्या नादाला लागू नका नाहीतर सगळेच बाहेर काढेन
अंबादास दानवे संजय शिरसाट यांना प्रत्युत्तर देताना म्हणाले, संजय शिरसाट हे स्वतः गुत्तेदारी करतात, ते मुंबईतील 72 व्या मजल्यावर राहतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 हजार स्क्वेअर फुटाचा बंगला त्यांनी कसा मिळवला याचं उत्तर द्यावे. माझ्या घरासमोर असलेल्या गाड्या या माझ्याच नावावर आहेत, तुमच्या घराच्या मागे असलेले जेसीबी, कोट्यवधी किमतीच्या गाड्या या कशा कमावल्या याचे उत्तर त्यांनी द्यावे. माझ्या नादाला लागू नका नाहीतर सगळेच बाहेर काढेन, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.
औकात नसणाऱ्यांना संघटनेच्या ताकदीवर पदे मिळाली
पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, निलमताईंना चार वेळा आमदार केले. दोन वेळा त्यांना उपसभापती केले आणि इतर दोन पदेही दिली. त्यामुळे त्यांनी 12 मर्सिडिज दिल्या का? त्या महिला आहेत म्हणून शब्द वापरता येत नाहीत पण नमक हरामीपणा केला जातोय. इतर महिलांना संधी न देता निलम ताईंना संधी दिल्या. तुम्ही गद्दारी केली तर केली. आता आहे तिथे नीट राहा ना. औकात नसणाऱ्यांना संघटनेच्या ताकदीवर पदे मिळाली. मी सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी कुठून मर्सिडिज देणार होतो. किमान बाळासाहेब ठाकरे यांच्याशी तरी इमान राखायला हवे होते. हे पाप तुम्हाला इथेच फेडायला लागणार आहे.