केंद्र सरकारच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलने पुण्यातील पीबीसी एरो हब रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन सोबत सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार डीजीसीएचे आगामी काळातील ड्रोन उड्डाणावरील प्रमाणपत्र अभ्यास प्रशिक्षण वर्ग पीबीसी मार्फत घेण्यात
.
याविषयी अधिक माहिती देताना पीबीसी एरो हब चे संचालक प्रणव चित्ते यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही ड्रोन प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत असून अनेक ठिकाणी आम्ही सेवा पुरवत आहोत. आज पर्यंत आम्ही महाराष्ट्र, गुजरात आणि ओडिसा राज्यातील होतकरू महिलांना नमो ड्रोन दीदी उपक्रमा अंतर्गत ड्रोन उडविण्याचे प्रशिक्षण दिलेले आहे. तसेच हजारहून जास्त विद्यार्थ्यांनी आमच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये ड्रोन विषयक धडे घेतले आहेत. नुकतेच आम्ही ड्रोन उड्डाणावरील अभ्यासक्रमांसाठी कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन स्कूल सोबत सामंजस्य करार केला असून आमच्यासाठी ही मोठी गोष्ट आहे. त्यानुसार डीजीसीएचे आगामी काळातील ड्रोन उड्डाणावरील अभ्यास प्रशिक्षण वर्ग पीबीसी मार्फत घेण्यात येणार आहेत.
दरम्यान, आगामी काळात सीमा भागात किंवा सरक्षण विभागात टेहाळणी करण्यासाठी वापरले जाणारे ड्रोन, युद्ध किंवा आक्रमनासाठी वापरले जाणारे, डोळ्यांच्या क्षमते पलीकडे म्हणजे साधारणता ३ ते ५ किमी उंचीवरुन उडान करणारे ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचे संचालक प्रणव चित्ते यांनी सांगितले.
