अभिनेता विकी कौशलचा छावा चित्रपट सध्या चांगलीच धुमाकूळ घालत आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. एकंदरीतच चित्रपट चांगलाच यशस्वी झाला असला तरी शिर्के कु
.
अमोल मिटकरी म्हणाले, महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे खरे आणि प्रमाणित चरित्र समोर आणण्यासाठी पुढाकार घ्यावा. यासंदर्भात इंद्रजीत सावंत, जयसिंगराव पवार आणि शिवचरित्रकार विजयराव देशमुख यांचा समितीत समावेश करावा, अशी ही मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे. तसेच ‘छावा’ चित्रपटाच्या माध्यमातून संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्व जगात जरी गेले असले, तरी त्यात काही बाबी अतिरंजित दाखविण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
अमोल मिटकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना नीलम गोऱ्हे यांच्या विधानावर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, नीलम गोऱ्हे यांच्या संदर्भात राऊतांनी लावलेले आरोप खोटे आहेत. उलट नीलम गोऱ्हे यांनी प्रत्येक वेळी आमच्यासारख्या नवोदित आमदारांना जनतेचे प्रश्न प्राधान्य क्रमाने उचलण्यासाठी मार्गदर्शन केले आहे, असे अमोल मिटकरी म्हणाले.
अमोल मिटकरी म्हणाले, ठाकरेंच्या पक्षात काय चालतंय हे आपल्याला माहित नाहीय. मात्र माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला अजित पवारांनी एक रुपयाही न घेता आमदार केले. आपले वडील लोकांकडे सालगडी म्हणून काम करत होते. तर आपण वडिलोपार्जित किराणा दुकानात पुड्या बांधण्याचे काम करीत होतो. अशा व्यक्तीला अजित पवारांनी आमदार केले, असे अमोल मिटकरी म्हणाले.