[ad_1]
कळमनुरी पंचायत समिती अंतर्गत घरकुलाचा ७० हजाराचा दुसरा हप्ता देण्यासाठी १५ हजाराची लाच घेणाऱ्या घरकुल विभागातील कंत्राटी अभियंत्यासह खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी ता. २४ दुपारी रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी दोघांवर कळमन
.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील एका लाभार्थ्याला घरकुल मंजूर झाले होते. या घरकुलाची पाहणी करून दुसरा हप्ता बँकेत जमा करण्यासाठी कंत्राटी अभियंता सागर पवार याने १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
त्यानंतर आज लाचलुचपतचे उपाधीक्षक विकास घनवट, निरीक्षक विनायक जाधव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख युनूस, विजय शुक्ला, जमादार तान्हाजी मुंडे, भगवान मंडलिक, राजाराम फुफाटे, रवींद्र वरणे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, गोविंद शिंदे, पंडीत वाघ, गजानन पवार यांनी आज दुपारी पंचायत समितीच्या परिसरात सापळा रचला होता.
दरम्यान, ठरल्या प्रमाणे तक्रारदाराने लाचेची १५ हजार रुपयांची रक्कम आणल्याचे सांगितल्यानंतर कंत्राटी अभियंता सागर पवार याने सदर रक्कम खाजगी व्यक्ती संजय मोरे (रा. कामठा, ता. कळमनुरी) याच्या कडे देण्यास सांगितले. सदर रक्कम स्वीकारताच लाचलुचपतच्या पथकाने दोघांनाही पकडले. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
अंगझडतीमध्ये सापडले ११ हजार रुपये
या प्रकरणात लाचलुचपतच्या पथकाने दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून एक मोबाईल व एकूण ११ हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. पथकाने कंत्राटी अभियंता सागर पवार याच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्डींग काढण्याची तयारी चालविली असल्याचे सुत्रांनी सांगितले.
[ad_2]