शहरालगत लिंबाळामक्ता येथील राधाबाई मुसळे कनिष्ठ महाविद्यालयात परिक्षार्थींचे मोबाईल परत देण्यासाठी ४ हजाराची लाच घेणाऱ्या प्राचार्य पंजाब गव्हाणे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी ता. ५ दुपारी रंगेहात पकडले. या प्रकरणी प्राचार्यासह दोघ
.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरालगत लिंबाळामक्ता येथे स्व. राधाबाई मुसळे कनिष्ठ महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाचा संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य म्हणून पंजाब गव्हाणे हा काम पाहतो. या महाविद्यालयात परिक्षा केंद्र देखील आहे. ता. २७ फेब्रुवारी रोजी तक्रारदाराचा मुलगा मोबाईल घेऊन परिक्षेला गेला होता. त्या ठिकाणी पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांचे मोबाईल जप्त करून प्राचार्य गव्हाणे याच्या ताब्यात दिले.
दरम्यान, काही विद्यार्थी मोबाईल मागण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी असलेला खाजगी इसम गोपाल कोंगे (रा.वायचाळ पिंपरी, ता. सेनगाव) याने प्राचार्य गव्हाणे याच्या सांगण्यावरून पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी एका विद्यार्थ्याच्या पालकाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती.
त्यानंतर आज लाचलुचपतचे उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक विनायक जाधव, प्रफुल्ल अंकुशकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक युनुस शेख, विजय शुक्ला, जमादार ज्ञानेश्वर पंचेलिंगे, भगवान मंडलिक, तानाजी मुंडे, राजाराम फुफाटे, गजानन पवार, रवींद्र वरणे, गोविंद शिंदे, शेख अकबर, महिला पोलिस कर्मचारी योगीता अवचार यांच्या पथकाने आज महाविद्यालयाच्या परिसरात सापळा रचला होता.
दरम्यान, तक्रारदाराने ४ हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्विकारताच प्राचार्य गव्हाणे यास ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात परिक्षार्थींचे १४ मोबाईल सापडले आहेत. या प्रकरणी प्राचार्य गव्हाणे व खाजगी व्यक्ती गोपाल कोंगे याच्या विरुध्द हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.