दर्यापुरातील 5,293 लाभार्थींच्या पेंशनला अखेर कात्री लागणार:प्रमाणीकरणासाठी गावागावात पडताळणी मोहीम सुरू

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थींना आता आधार व मोबाईल नंबर प्रमाणीकरण (व्हेरीफिकेशन) बंधनकारक करण्यात आले आहे. परिणामी राज्य सरकारने जानेवारी, फेब्रुवारी व पुढील अनुदान अशा प्रमाणीकरण केलेल्या लाभार्थींना देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका आधार प्रमाणीकरण नसलेल्या दर्यापूर तालुक्यातील ५ हजार २९३ लाभार्थींना बसणार आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ … Read more

सोबत राहणाऱ्यांंवर लक्ष ठेवा,गैर कामे करणाऱ्यांना दूर ठेवा- अजित पवार:मंत्री, आमदारांसह पदाधिकाऱ्यांचा मुंबईत घेतला विशेष शिकवणी वर्ग

सरपंच हत्या प्रकरणात निकटवर्तीयच गुंतल्याने धनंजय मुंडंेना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या पक्षाचे मंत्री, आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्षांची बैठक घेतली. आपल्यासोबत राहणाऱ्यांवर लक्ष ठेवा, तो काय काम करतो हे पाहा, त्याचे चारित्र्य तपासा, गैर-चुकीची कामे करणाऱ्यांना दूर ठेवा. महायुतीच्या आमदारांशी समन्वय साधून स्थानिक पातळीवर कामकाज करा, असा शिकवणी वर्ग … Read more

भारतीय भाषा परिवारावर राष्ट्रीय परिसंवाद:लुप्तप्राय भाषांचे संरक्षण आणि दस्तऐवजीकरणावर भर

डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, पुणे व भारतीय भाषा समिती, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहयोगाने भारतीय भाषा परिवार या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादाचा मुख्य उद्देश देशातील मूळ आणि लुप्तप्राय होणाऱ्या भाषांचे संरक्षण आणि दस्तऐवजीकरण तसेच भाषाशास्त्रात तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर प्रकाश टाकणे हा होता. परिसंवादाची सुरुवात पद्मश्री चमूकृष्णशास्त्री यांच्या उद्घाटनपर दृकश्राव्य माध्यमाने झाली. … Read more

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था कोलमडली:शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पुण्यात आंदोलन, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता भाजप खासदार रक्षा खडसे यांची मुलगी असुरक्षित आहे, भाजप बूथ प्रमुख सरपंच संतोष देशमुख ह्यांची सत्तेतील लोकांकडूनच क्रुरपणे हत्या केली जाते, भाजप चा आमदार मंत्री जयकुमार गोरे स्वतःचे विवस्त्र फोटो महिलेला पाठवतो ह्या सर्व घटना सत्ताधारी लोकांच्याच आहेत म्हणजे महाराष्ट्राला, सामान्य माणसाला सत्ताधारी लोकांकडूनच धोका आहे हे दिसून येते, आमदार अबू … Read more

जिल्हा परिषद अमरावतीचा अर्थसंकल्प तयारीला वेग:मार्चअखेर सादरीकरण; विभागांकडून मागण्यांची नोंदणी सुरू

अमरावती जिल्हा परिषदेचा सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प मार्चअखेर सादर करण्याच्या दृष्टीने लेखा व वित्त विभागाने कामाला सुरुवात केली आहे. नवनियुक्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी (कॅफो) डॉ. हेमंत ठाकरे यांनी सर्व विभागप्रमुखांना पत्र पाठवून मागण्या नोंदवण्यास सांगितले आहे. डॉ. ठाकरे यांच्या नियुक्तीपूर्वी सहायक कॅफो डॉ. अश्विनी मारणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांच्या मार्गदर्शनाखाली … Read more

आदर्श गुप्ता हत्याकांड:शेतात लपलेल्या पाचव्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

अमरावतीतील नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या आदर्श गुप्ता हत्या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. संकेत देवीदास साहू असे या आरोपीचे नाव असून त्याला वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शेतातून ताब्यात घेण्यात आले. कडबी बाजार परिसरात रविवारी सायंकाळी सात वाजता आदर्श राजेश गुप्ता (२७, मसानगंज) याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात … Read more

निकृष्ट रस्त्याच्या कामासाठी सरपंचाला लाच देणारा कंत्राटदार जेरबंद:हिंगणगावच्या सरपंचाने एसीबीकडे केली तक्रार; 20 हजारांची लाच देऊ करणाऱ्याला अटक

धामणगाव रेल्वे तालुक्यातील हिंगणगाव येथे एक प्रशंसनीय घटना घडली आहे. येथील सरपंच दुर्गाबक्षसिंह ठाकुर यांनी निकृष्ट रस्त्याच्या कामासाठी लाच देऊ करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध कारवाई केली आहे. अरिहंत नगर येथे सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू होते. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे सरपंच ठाकुर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी कंत्राटदार मनीष श्रीखंडे आणि सुरेश बुधानी यांना बांधकामाचा दर्जा सुधारण्याच्या … Read more

घाटकोपरची भाषा गुजराती:मुंबई येणाऱ्याने मराठी शिकलीच पाहिजे असे नाही, भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य

महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत मराठी माणूस आणि परप्रांतीय लोकांमध्ये अनेकवेळा भाषेवरून वाद होताना दिसतात. मुंबईमध्ये राहायचे असेल तर मराठी भाषा बोलावी लागेल असा आग्रह मराठी माणसाचा असतो तर काही परप्रांतीय मराठी बोलण्यास स्पष्ट नकार देतात. यावरून अनेकदा वाद झाले आहेत आणि काही भागात अजूनही होतात. त्यात आता आणखी भर पडली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते … Read more

मनसेचा ऐतिहासिक क्षण:पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदाच 19 व्या वर्धापन दिनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत मेळावा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रथमच पिंपरी चिंचवड शहरात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी (दि. ९ मार्च) सकाळी ९:३० वाजता, राज ठाकरे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. बुधवारी पिंपरी येथे आयोजित … Read more

विद्रोही कवी नामदेव ढसाळांच्या समर्थनात साहित्यिकांचा अनोखा विरोध:गुडलक चौकात कवितांचे वाचन करून सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाचा निषेध

भारतीय चित्रपट सेन्सॉर बोर्डाने विद्रोही कवी, पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्याती साहित्यिक, कवी यांनी एकत्र येत अभिनव पद्धतीने गुडलक चौकातील कलाकार कट्ट्यावर आंदोलन केले. ‘नामदेव तुझा बाप’ असे म्हणत नामदेव ढसाळ यांच्या कविता व लेखनांचे वाचन, आणि विद्रोही कवितांचे सादरीकरण करत सेन्सॉर बोर्डाच्या कोण नामदेव ढसाळ? या प्रश्नाला उत्तर दिले. सम्यक … Read more