कोंडी फुटणार:पत्रकार चौक ते नेप्ती नाका दरम्यानचा रस्ता महिन्याभरामध्ये वाहतुकीसाठी होणार खुला

मध्यवर्ती शहर व सावेडी उपनगर परिसराला जोडणारा व वाहतुकीचा प्रमुख रस्ता असलेल्या पत्रकार चौक ते नेप्ती नाका चौक रस्त्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. या रस्त्याच्या कामासाठी लालटाकी येथील वैष्णव मातेचे मंदिर नागरिकांच्या सहकार्यातून स्थलांतरित करण्यात आले. जिल्हा रुग्णालय व वारुळाचा मारुती परिसर येथील मंदिरेही स्थलांतरित केली जाणार आहेत. त्यामुळे येत्या महिनाभरात उर्वरित कामे … Read more

सोलापूरकरांचा आवाज दिव्य मराठीत:कुठे बंगल्यावर दवाखान्याचे आरक्षण, रस्त्याची रुंदी 10, दाखवली 6 मीटर, सुनावणीसाठी माजी नगरसेवकांची महापालिकेत गर्दी

रामलाल चौक परिसरात गौरीशंकर अपार्टमेंट गेल्या अनेक वर्षांपासून असताना त्यावर दवाखान्याचे आरक्षण टाकण्यात आले. रस्ता दहा मीटर रूंद असताना ड्रोनच्या चुकीमुळे आराखड्यात सहा मीटर दाखवण्यात आला आहे. हे सर्व मुद्दे घेऊन माजी नगरसेवक महापालिकेत आले होते. शहर विकास प्रारूप आराखड्यावरील हरकतींवर चार सदस्यीय समितीकडून दुसऱ्या टप्प्यातील सुनावणी सुरू झाली. माजी महापौर आरिफ शेख, संजय हेमगड्डी, … Read more

खराडीत पीएमपी बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू:रस्ता ओलांडताना दिली धडक, चालकावर गुन्हा दाखल

भरधाव वेगाने जात असलेल्या पीएमपी बसच्या धडकेत पादचारी ७१ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना पुणे नगर रस्त्यावरील खराडी भागात घडली. याप्रकरणी पीएमपी बस चालकाविरुद्ध खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महानंदा मुंजाजी आरसुळ (वय ७१, रा. खराडी गावठाण, नगर रस्ता) असे मयत झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी पीएमपी बस चालकाविरुद्ध हलगर्जीपणा केल्याचा … Read more

महाराष्ट्र दिन विशेष:महाराष्ट्रासाठी 105 जणांचे हौतात्म्य, कॉम्रेड डांगेंनी केले लढ्याचे नेतृत्व; शाहिरांची साथ, अत्रेंच्या तोफेची रोमहर्षक गाथा!

संयुक्त महाराष्ट्राचा लढा मुंबईच्या रस्त्यावर लढला गेला. त्यात 105 हुतात्मे झाले. यापैकी तब्बल 85 जण मुंबईतले गिरणी कामगार होते. या कामगारांचे नेतृत्व कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांनी केले. त्यांच्या तडाख्यामुळेच मुंबई महाराष्ट्राला मिळाली. श्रीपाद डांगे यांचे संघटना बांधणीचे असामान्य कौशल्य, घणाघाती भाषणे या दुग्धशर्करा योगाने संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाला. त्यामुळे कॉम्रेड डांगे संयुक्त महाराष्ट्राचे … Read more

रिद्धपूरचा गौरव:श्री चक्रधर स्वामींचा अवतारदिन राज्य शासन साजरा करणार, महानुभाव पंथाकडून निर्णयाचे स्वागत

महानुभाव पंथाचे प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा अवतारदिन राज्य शासन आता अधिकृतपणे साजरा करणार आहे. भाद्रपद शुक्ल द्वितीयेला (यंदा २५ ऑगस्ट रोजी) हा दिवस ‘अवतार दिन’ म्हणून साजरा केला जाईल. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे परिपत्रक बुधवारी जारी केले. श्रीचक्रधर स्वामींचे पावन स्थळ असलेल्या मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथे यापूर्वीच देशातील पहिले मराठी विद्यापीठ स्थापन करण्यात … Read more

अष्टविनायक पतसंस्थेच्या निवडणुकीत श्री प्रगती सहकार पॅनलचा विजय:13 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वसाधारण ते राखीव प्रवर्गातून नवे संचालक निवडले

अमरावती जिल्ह्यातील बेनोडा येथील अष्टविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत श्री प्रगती सहकार पॅनलने बाजी मारली आहे. 27 एप्रिल रोजी अमरावती, मोर्शा आणि वरुड येथे झालेल्या मतदानानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी पार पडली. नव्याने निवडलेले संचालक मंडळ 2025 ते 2030 या कालावधीसाठी कार्यरत राहणार आहे. सर्वसाधारण मतदार संघातून विलासराव अढाऊ, तुषार घोंगडे, बाबाराव जगताप, विजयराव … Read more

पुण्यात बाल-कुमार चित्रपट महोत्सवाचा समारोप:ऐतिहासिक चित्रपटांमुळे संस्कारक्षम पिढी घडेल : मुरलीधर मोहोळ

महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राचा इतिहासही वैभवशाली आहे. मुलांना ऐतिहासिक चित्रपट दाखविल्यास भविष्यात संस्कारक्षम पिढी निश्चित घडेल, असा विश्वास केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. संवाद, पुणे, कोहिनूर ग्रुप व कावरे आईस्क्रीम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल-कुमार चित्रपट महोत्सवाचा समारोप समारंभ आज (दि. 30) सिटी प्राईड, कोथरूड येथे आयोजित करण्यात … Read more

माण तालुक्यातील पाणी प्रश्नावर म्हसवड येथे अर्धनग्न मोर्चा:मंत्री जयकुमार गोरे यांनी धमकी दिल्याचा सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप

माण तालुक्याच्या पूर्व भागाला तारळी योजनेचे पाणी तातडीने मिळावे, वर्षातून किमान तीन आवर्तने द्यावीत आणि शासनाच्या नियमानुसार ‘टेल टू हेड’ पद्धतीने समान जलवाटप व्हावे, या प्रमुख मागण्यांसाठी आज (दि. ३०) म्हसवड (ता. माण) येथे सामाजिक कार्यकर्ते महेश कर्चे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढला. मोर्चा काढू नये म्हणून ग्राम विकास मंत्र्यांनी बराच दबाव आणल्याचा व … Read more

छगन भुजबळांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट:जातीनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाबाबत मानले आभार

केंद्र सरकारच्या वतीने जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्यासह केंद्र सरकारचे आभार मानले. जातीनिहाय जनगणना करण्याची राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची सन 1992 सालापासून मागणी मागणी होती. … Read more

प्रवरा साखर कारखाना अपहार प्रकरण:हे प्रकरण आमच्यासाठी संपले आहे, चौकशीला सामोरे जाण्याची पूर्ण तयारी – राधाकृष्ण विखे पाटील

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सादर झालेल्या चौकशी अहवालानंतर सदर प्रकरणात कोणताही फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल होत नसल्याचा निष्कर्ष २०१९ मध्येच सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे दिल्यामुळे आम्हाला कोणतीही चिंता नाही. आमची कोणतीही अडचण नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीने हे प्रकरण संपले आहे. नव्याने पुन्हा काही चौकशी होणार असली तर, त्याला सामोरे … Read more