शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले. पण जयंत पाटील यांचा राजकीय भविष्याबाबत बोलण्याइतका मोठा माणूस नाही, पण त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असे
.
दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, जयंत पाटील हे माझी वेळ घेऊन भेटायला आले होते. तिथे 400 ते 500 लोकं उपस्थित होती. आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. केवळ विकास कामांसंदर्भात चर्चा झाली.
महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, जयंत पाटील यांनी त्यांच्या सांगली जिल्ह्यातील विकासकामांबाबत चर्चा केली. मी त्यांना आश्वासन दिले आहे की, येणाऱ्या अधिवेशनात त्यांच्या समस्यांच्या संदर्भात एक बैठक माझ्या दालनात लावणार आहे. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते त्यांच्या मतदारसंघाचे प्रश्न घेऊन भेटायला आले होते. यावेळी विकासकामांवर सविस्तर चर्चा झाली. जयंत पाटील यांनी सर्व विषय माझ्यासमोर मांडले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे त्यावेळी माझ्यासोबत होते.
राजकीय भेट नव्हती- जयंत पाटील
जयंत पाटील म्हणाले की, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत माझी 25 मिनिटे चर्चा झाली, पण भेटीत राजकीय हेतू नव्हता असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नांदेड येथे सांगितले. मी सांगली येथील महसूलच्याप्रश्नाबाबत भेट घेतली. या वेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील होते. पण, ही भेट राजकीय नव्हती. विधानसभा सदस्य म्हणून एखाद्या मंत्र्याला त्यांच्या विभागाच्या कामासंदर्भात भेटणे हे काही गैर नाही. तरीही प्रसारमाध्यमे अशा प्रकारच्या बातम्या बनवितात हे खेदजनक आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले होते.
भेट घेण्यात काही गैर नाही
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी अनेकदा दिल्लीतील मंत्र्यांना भेटत असते त्यांचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत असते. यात काही गैर नाही. विकास कामासंदर्भात मंत्र्यांच्या भेटी घ्याव्याच लागतात.