.
इतिहासाचा खोलवर अभ्यास केला, तर छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्म समभावाचे प्रतिक असल्याचे आपणास दिसून येते. त्याचा उल्लेख इतिहासाच्या पानापानात दिसून येत असल्याचे प्रतिपादन शेख सुभान अली यांनी केले. मराठा सेवा संघ व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीद्वारे आयोजित शिवजयंती महोत्सवात प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी आ. गजानन लवटे, बाळासाहेब गोंडचवर, मधुकर मेहेकरे, सुयोग खाडे, सीमा बोके, देविदास नेमाडे, सुरेंद्र टांक, प्रमोद दाळू, कपिल देशमुख, प्रदीप येवले, शरद कडू, सारिका मानकर, विकास घोगरे, सचिन गावंडे, प्रदीप देशमुख, राजू आकोटकर, अफसर बेग, रमेश सावळे, शफी नियाजी, गजानन कविटकर, राजेश शिंगणे उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख वक्त्यांनी शिवाजी महाराज सर्व धर्माला सोबत घेऊन चालणारे होते हे सप्रमाण आपल्या व्याख्यानातून सांगितले.
गणेश नगर येथून निघालेल्या शोभायात्रेत शिवाजी महाराज, माँ जिजाऊ, घोड्यावरील बाल शिवाजीसह विविध देखावे शहरवासीयांचे आकर्षण ठरले होते. शोभायात्रेची सांगता नगर परिषद विद्यालयात झाली. या प्रसंगी खा. बळवंत वानखडे व आ. गजानन लवटे यांचा सत्कार करण्यात आला.