अमरावती येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मंगळवारी शहरातील तीन ठिकाणी धाडी टातल्या. हे तिघेही अवैध सावकारी करत असल्याची तक्रार या विभागाकडे आली होती. त्यानंतर तीन वेगवेगळी पथके गठित करून महाजनपुरा, गडगडेश्वर आणि आनंदनगर ये
.
मृत सावकाराच्या परवान्याचा वापर तीनपैकी एका पथकाने गडगडेश्वर मंदिराजवळ कारवाई केली. पथक प्रमुख सहायक निबंधक स्वाती गुडधे होत्या. ही कारवाई दुपारी साडेबारा ते सायंकाळी ७ पर्यंत चालली. या ठिकाणाहून मृत व्यक्तीच्या नावाचा परवाना, कर्जाऊ रकमेच्या मोबदल्यात कर्जदाराकडून घेतलेले विविध बँकांचे ७९ कोरे धनादेश, रुपये १०० चे तीन कोरे मुद्रांक आणि १० दुचाकींची आरसी जप्त केली. या पथकात सुधीर मानकर, उज्ज्वला मोहोड, राहुल पुरी यांचा समावेश होता. तर पंच म्हणून प्रीतम बेलसरे व नितीन याचाडे यांचा सहभाग होता.