नाटकांवरील जीएसटीचा प्रश्न शरद पवारांनी 10 सेकंदात सोडवला:अभिनेते परेश रावल यांनी सांगितला किस्सा, म्हणाले – हे आहेत मराठी लोक

अभिनेते परेश रावल यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केले आहे. नाटकांवरील जीएसटीचा प्रश्न बरेच दिवस सुटत नव्हता. परेश रावल यांनी शरद पवारांना विनंती केली आणि अवघ्या दहा सेकंदात तो प्रश्न सुटला. असे सांगत परेश रावल यांनी त्यांच्या कार्यक्षमतेची आणि मराठी माणसाच्या ताकदीची जाहीरपणे प्रशंसा केली … Read more

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सावध राहावे:अजगर कधी गिळणार हे त्यांना कळणारही नाही, प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महायुती सरकारचे प्रगती पुस्तक सर्वांसमोर मांडले. राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यकलीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देत टीका केली आहे. तसेच यावेळी पत्रकारांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या युतीच्या … Read more

शेवटी पवारांना हिंदू धर्माला शरण जावे लागले:ते स्वतःला पूजा करताना देखील दाखवू शकतात, प्रकाश महाजनांची सडकून टीका

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेत ठाण्यात अक्षय्य तृतीयेच्या दिवशी प्रति तुळजाभवानी मंदिर उभारण्यात आले. शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर शरद पवारांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती तसेच पहलगाम हल्ला या विषयांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आता शरद पवार यांच्यावर मनसे नेते … Read more

महाराष्ट्राच्या हितासाठी दोघेही मनाचा मोठेपणा दाखवत असतील तर कौतुकास्पद:मतभेद असावेत, मनभेद नाही; राज-उद्धव ठाकरेंच्या युतीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या राजकारणात कमालीचे बदल होताना दिसत आहेत. त्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर महाराष्ट्राच्या हितासाठी दोघेही मनाचा मोठेपणा दाखवत असतील, तर कौतुकास्पद आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. आज महाराष्ट्र दिनानिमित्त सुप्रिया सुळे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट … Read more

भाजप-काँग्रेसची जातगणनेवर दुटप्पी भूमिका:प्रकाश आंबेडकर यांचा आरोप; हे दोन्ही पक्ष जातीयवादी व आरक्षण विरोधी असल्याचा दावा

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जातीनिहाय जनगणनेच्या मुद्यावरून केंद्रातील सत्ताधारी भाजप व विरोधी बाकावरील काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजप-काँग्रेसची जातगणनेवर दुटप्पी भूमिका आहे. मुळात हे दोन्ही पक्ष जातीवादी व आरक्षणविरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर गुरुवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले की, भाजप व काँग्रेस हे दोन्ही पक्ष जातीनिहाय जनगणनेवर आपला दावा … Read more

यवतमाळ शहरात दुहेरी हत्याकांड:मोठ्या भावाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारत हत्या, तर भांडणात मध्यस्थी करणाऱ्या जावयाचा खून

राज्यात सध्या गुन्हेगारीत चांगलीच वाढली आहे. खून, अत्याचार अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात यवतमाळ शहर दुहेरी हत्याकांडाने हादरले आहे. कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करत निर्घृण खून केला आहे. तर दुसऱ्या घटनेत भांडणात मध्यस्थी केल्याने बेदम मारहाण करत जावयाची हत्या करण्यात आली आहे. या दोन्ही घटनांनी शहर हादरले आहे. … Read more

राज्यातील जल जीवन मिशन योजना कुचकामी:मापदंडाच बदल करणे गरजेचे, मंत्री नरहरी झिरवाळांचा सरकारला घरचा आहेर

राज्यातील जल जीवन मिशन योजनेद्वारे अनेक ठिकाणी पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी असून सदर योजनाच कुचकामी ठरली आहे असे म्हणत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. हिंगोलीमधील येथील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर ध्वजारोहनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान पत्रकारांनी जल जीवन मिशन अंतर्गत अनेक गावात नळ योजना झाली … Read more

महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय राजकारण नाही:मी आमदार झालो असतो तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते, शहाजीबापू पाटील यांचा दावा

गंगेचा उगम पवित्र आहे. कारण तिचा उगम शंकराच्या जटेतून झाला. तसा शिवसेनेचा उगम बाळासाहेब ठाकरेंपासून झाला. त्यामुळे ती ही पवित्र आहे. महाराष्ट्रात शिवसेना पक्षाशिवाय कोणतेही राजकारण होऊ शकत नाही, असा दावा ‘काय झाडी काय डोंगर’ फेम शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी गुरुवारी केला. मी आमदार झालो असतो तर एकनाथ शिंदे निश्चितच मुख्यमंत्री झाली असते, … Read more

'सरकार मोदी की सिस्टिम राहुल गांधीकी':संजय राऊत यांचा जनगणनेच्या निर्णयावरुन निशाणा; श्रेय राहुल गांधींचे असल्याचा दावा

जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारचा असला तरी त्याचे श्रेय राहुल गांधी यांचेच असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ‘सरकार मोदी की सिस्टिम राहुल गांधीकी’ अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या दहा वर्षांपासून राहुल गांधी हा मुद्दा मांडत असल्याचा दावा देखील त्यांनी केला. केंद्रात सरकार … Read more

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मराठीतून शुभेच्छा:गौरवशाली इतिहास आणि जनतेच्या धैर्याचाही केला उल्लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी मराठीतून या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या विकासात महाराष्ट्र कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये म्हटले आहे. एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून पोस्ट करत या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये त्यांनी या भूमीचा गौरवशाली … Read more