‘फडणवीस विमा पॅटर्न’ शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक:पहिल्यासारखी विमा योजना सुरु ठेवा अन्यथा गप्प बसणार नाही, काँग्रेसचा सरकारला इशारा

भाजप युती सरकारने पीक वीमा योजनेत मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत केलेला नवा बदल चुकीचा असून तो शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. २५ वर्षापासून सुरु असलेली विमा योजना बंद करण्याची गरज नव्हती. योजनेत काही त्रुटी असतील तर त्यात बदल करता आला असता, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करता आला असता पण पूर्ण योजनाच बदलल्याने शेतकऱ्यांचे नुकसानच होणार आहे. हा नवा … Read more

नागपुरात दोन बालविवाह रोखले:15 आणि 17 वर्षीय मुलींचा विवाह थांबवला; मुलींना बालगृहात हलवले

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात जिल्हा बाल संरक्षण पथकाने दोन बालविवाह रोखले. डोंगरगाव येथे १५ वर्षीय मुलीचा आणि कन्हान परिसरात १७ वर्षीय मुलीचा विवाह थांबवण्यात आला. दोन्ही मुलींना सुरक्षिततेसाठी बालगृहात हलवण्यात आले. डोंगरगाव येथील प्रकरणात मंडप सजवून ठेवला होता. मुलीला हळद लावण्यात आली होती. पाहुणे येत होते आणि स्वयंपाकही तयार होता. याच वेळी बाल संरक्षण पथकाने … Read more

विजय तेंडुलकरांचे 'घाशीराम कोतवाल' नाटक आता हिंदीत:संतोष जुवेकर साकारणार मुख्य भूमिका; जूनमध्ये पहिला प्रयोग

विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक मराठी आणि भारतीय रंगभूमीवरील एक अत्यंत महत्वाचे नाटक म्हणून ओळखले जाते. आता घाशीराम कोतवाल हे नाटक हिंदीमध्ये व्यावसायिक रंगभूमीवर येत असल्याची घोषणा प्रसिद्ध चित्रपट निर्माते, लेखक, दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. ‘घासीराम कोतवाल’ असे या नाटकाचे हिंदी नाव असून या नाटकातील कलावंतांचा संच ५० … Read more

पिंपळगावच्या उपसरपंचाने कचरा विलगीकरण शेड केले जमीनदोस्त:पोलिस स्टेशन आंधळगाव येथे गुन्हा नोंद

जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव (कान्ह.) च्या वतीने 15 वित्त आयोग अंतर्गत कचरा विलगीकरणाचे काम कान्हळगाव रोडवर सुरू आहे. सदर कामाला ग्राम पंचायत कार्यालय पिंपळगावचे उपसरपंच उमेश रामदास उपरकर व विजय सखाराम चोपकर यांचा विरोध होता. गावातील अंतर्गत राजकारणामुळे सदर कामाला विरोध करीत दोघांनीही दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी कामाच्या ठिकाणी जाऊन काम बंद … Read more

जातीनिहाय जनगणनेची घोषणा निवडणुकी पुरती नसावी:ही घोषणा केवळ राजकीय स्टंट राहू नये, केंद्रीय कॅबिनेटच्या निर्णयावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

गेल्या काही वर्षांपासून देशभर चर्चेत असलेल्या जातीनिहाय जनगणनेबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या काळात जातीनिहाय जनगणना करण्यात येणार असल्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे जातीनिहाय जनगणनेसाठी सत्ताधाऱ्यांकडून विरोध केला जात होता. मात्र, आता देशात जातीय जनगणना करण्यात येणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. केंद्र … Read more

पुलवामा हल्ल्यातील शौर्यचक्र विजेते झिले सिंह यांचा सन्मान:सूर्यदत्त राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने गौरव; पत्नीला स्त्रीशक्ती पुरस्कार

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा आतंकवादी हल्ल्यावेळी आपल्या प्राणांची बाजी लावत, शौर्याने लढून विजयश्री खेचून आणणारे केंद्रीय राखीव सुरक्षा दलातील (सीआरपीएफ) असिस्टंट कमांडर झिले सिंह यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय शौर्य पुरस्कार २०२५’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांच्या पत्नी सुनीता झिले सिंह यांना ‘सूर्यदत्त स्त्रीशक्ती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया व … Read more

आयसीएसई, आयएससी बोर्डाचे निकाल जाहीर:दहावीचे 99.09%, बारावीचे 99.02% विद्यार्थी उत्तीर्ण; फडणवीसांच्या मुलीला 92.60% गुण

भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने म्हणजेच CISCE ने आज 30 एप्रिल रोजी ISC आणि ICSE बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. आयसीएसई म्हणजेच दहावीमध्ये 99.09% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि आयएससी म्हणजेच बारावीमध्ये 99.02% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे निकाल सकाळी 11 वाजता बोर्ड कार्यालयात एकाच वेळी जाहीर करण्यात आले. बोर्डाने … Read more

मनोज जरांगे हा येडपट, खुळचट, बावळट माणूस:लक्ष्मण हाके यांनी वापरले अपशब्द; जरांगे उपोषणाला बसताच मुंबई गाठण्याचा इशारा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हा अतिशय येडपट, खुळचट व बावळट माणूस आहे. ते ज्या दिवशी मुंबईत उपोषणाला बसतील त्याच दिवशी आम्ही माळेगावच्या खंडोबाला नारळ फोडून मुंबईच्या दिशेने लाँग मार्च करू, अशा शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बुधवारी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाला बसण्याची … Read more

पहलगाम हल्ल्यापू्र्वी जालन्याच्या तरुणाला अतिरेकी भेटले?:'आज गर्दी कमी, उद्या येऊ' असे म्हणाल्याचा दावा; NIA ला दिली माहिती

जम्मू काश्मीरच्या पर्यटनाला गेलेल्या एका तरुणाने पहलगाम हल्ला करणारे अतिरेकी हल्ल्याच्या एक दिवस अगोदर आपल्याला भेटल्याचा मोठा दावा केला आहे. या तरुणाने आपल्या दाव्याची माहिती एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेलाही दिली आहे. जालन्यातील संजय राऊत हे आपला मुलगा आदर्श व पत्नीसोबत काश्मीरला फिरण्यास गेले होते. 21 एप्रिल रोजी ते पहलगामला गेले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी … Read more

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी देवेन भारती:विवेक फणसाळकर यांची घेणार जागा; राज्याच्या राजधानीतील कायदा सुव्यवस्था सांभाळणाचे आव्हान

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी वरिष्ठ पोलिस अधिकारी देवेन भारतीय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते मावळते पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची जागा घेतील. फणसाळकर आज पोलिस दलातून निवृत्त होणार आहेत. देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्या मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त आहेत. त्यांनी 30 जून 2022 रोजी या पदाची सूत्रे स्वीकारली होती. … Read more