दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून काही राजकीय वक्तव्ये देखील समोर आली आहेत. या सर्व व्यक्तव्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडे बोल सुनावलेत. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर बोलताना प्रत्येकाने मर्यादा
.
इतकेच नाही तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात सुरू झालेल्या सुसंवादाचे देखील त्यांनी स्वागत केले. मात्र, ते करत असतानाच सकाळच्या भोंग्याला देखील माध्यमांनी सुसंवाद शिकवायला हवा, असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात एकत्र आले होते त्यांच्यामध्ये सुसंवाद झाला. राज्यात कोणीही कोणाशी सुसंवाद साधत असेल तर त्याचे स्वागतच आहे. राज्यात कोणीही विसंवाद करू नये. सुसंवाद असायलाच हवा, यात कोणाचेही दुमत असायचे कारण नाही. तसेच आपणही सर्वांनी मिळून सकाळी नऊ वाजेच्या भोंग्याला देखील सुसंवाद कसा करायचा हे शिकवले तर राज्यातील संवादाची परिस्थिती चांगली होईल, असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. ज्याप्रमाणे 50 टक्के दोषी हे सकाळचा भोंगा वाजवणारे आहेत त्याचप्रमाणे माध्यमे देखील त्याला 50 टक्के दोषी असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
चौकशीचा अर्थ अनियमितता नाही
आमच्याकडे कोणीही तक्रार केली तरी त्या तक्रारीची आम्ही चौकशी करत असतो. त्यामुळे कृषी विभागाबाबत आलेल्या तक्रारीच्या प्रकारची चौकशी आम्ही करत आहोत. मात्र तक्रार झाली म्हणजे अनियमितता झाली असे म्हणण्याचे काही कारण नाही. तक्रारीच्या चौकशीतून जे काही समोर येईल त्यानंतरच याबद्दल अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. कृषी विभागात अनेक प्रकारे गैरव्यवहार झाले असल्याचा आरोप होत आहे. यासाठी माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना जबाबदार धरले जात आहे. या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
साहित्य संमेलनाच्या मर्यादा पाळाव्यात
प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा ठेवायला हव्यात. विशेषतः जे साहित्यिक आहेत, त्या साहित्यिकांनी देखील वारंवार असे वाटते की, राजकारण्यांनी आमच्या व्यासपीठावर येऊच नये. किंवा तशा प्रकारचे त्यांचे नेहमी वक्तव्य असते. अशावेळी साहित्यिक यांनी देखील पार्टी लाइनवरच्या कमेंट करणे योग्य नाही. त्यांनीही मर्यादा पाळायला पाहिजे, असे माझे मत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नीलम गोऱ्हे या उद्धव ठाकरे यांच्या पक्षात होत्या. मी त्या पक्षात नव्हतो. त्यामुळे त्या पक्षात काय चालायचे हे त्याच सांगू शकतात. मी त्यावर कमेंट करू शकत नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मंत्र्यांचे पीएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांनाच असतो
मंत्र्यांचे पीएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांनाच असतो, हे माणिकराव कोकाटे यांना माहिती नसेल. मंत्री केवळ नावांची शिफारस करत असतात. तो प्रस्ताव आल्यानंतर मुख्यमंत्री त्यावर अंतिम निर्णय करतात. हे काही नव्याने होत नाही. यासंबंधी मंत्रिमंडळ बैठकीत देखील मी सांगितले आहे. मंत्र्यांनी हवे ती नावे पाठवावी. मात्र त्या नावांमध्ये ज्यांची नावे फिक्सर म्हणून किंवा चुकीच्या कामांमध्ये आहेत. त्यांना मान्यता देणार नाही, असे मी सांगितले आहे. आतापर्यंत 125 च्या जवळपास नावे माझ्याकडे आली आहेत. त्यातील 109 नावे क्लियर केलेली आहेत. उर्वरित नावे क्लियर केलेली नाही. कारण त्यांच्यावर कुठला तरी आरोप आहे किंवा त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे कोणीही नाराज झाले तरी अशा प्रकारच्या नावांना मान्यता देणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केला आहे.