Dhananjay Munde is the patron of cruel criminals angry reaction by SambhajiRaje Chhatrapati | क्रूर गुन्हेगारांचा आश्रयदाता धनंजय मुंडेच: आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच, संभाजीराजे छत्रपतींचा हल्लाबोल – Mumbai News

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली व धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. महाराष्ट्रातील जनतेच्या आक्रोशापुढे झुकत तब्येतीचे कारण पुढे करत आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. य

.

स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो बाहेर पडले, यामुळे केवळ या प्रकरणातील आरोपींचेच नाही तर या आरोपींना पोसणाऱ्या, पाठीशी घालणाऱ्या अनेकांचे चेहरे व या चेहऱ्यांमागची विकृती उघडी पडली आहे. या क्रूर गुन्हेगारांचा आश्रयदाता धनंजय मुंडेच असल्याचे जाहीरपणे सांगून नि:पक्षपातीपणे या प्रकरणाचा तपास व्हावा, यासाठी धनंजय मुंडेला मंत्रिपदच देऊ नये, अशी मागणी आम्ही अडीच महिन्यांपूर्वी केली होती, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.

पुढे बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, लोकभावना बासनात गुंडाळून मुंडेला मंत्रिपद दिले गेले. राजीनाम्याच्या मागणीकडेही अडीच महिने दुर्लक्ष केले गेले. किंचितही नैतिकता असती तर अडीच महिन्यांपूर्वीच हा राजीनामा दिला गेला असता. मंत्रिपदाचे कवच घालून आरोपपत्र दाखल होण्याची वाट पाहत होता का? आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच आहे, असे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी हल्लाबोल केला आहे.

राजीनामा देताना तब्येतीचे कारण केले पुढे

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी राजीनामा देताना तब्येतीचे कारण पुढे केले आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. धनंजय मुंडे म्हणाले, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहेत. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे.

धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याचे कारण वैद्यकीय सांगितले आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नैतिकतेतून राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया दिली होती. धनंजय मुंडे यांनी दिलेले कारण व अजित पवारांनी दिलेली प्रतिक्रिया यात विसंगती दिसून आल्याने देखील संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment