आपल्या समग्र शिक्षणपद्धतीवर पाश्चात्त्य विचार, आचारांचा प्रभाव दिसून येतो. त्याऐवजी आपल्या शिक्षण पद्धतीत भारतीयता महत्त्वाची आहे, ती जपणारा आशय आपल्या शिक्षणपद्धतीत असावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि ‘माय होम इंडिया’ या संस्थेचे राष्ट
.
कावेरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या कावेरी काऊंसिलिंग युनिटच्या ३० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेच्या एरंडवणे येथील जी एम शेट्टी मेमोरियल हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कन्नड संघाच्या सचिव मालती कलमाडी, ज्येष्ठ अभिनेते व मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे, मानसतज्ज्ञ डॉ. कीर्ती पै, मानसतज्ज्ञ मुक्ती शहा, संस्थेच्या सहसंचालिका डॉ. देवसेना देसाई, फ्रेनी तारापोर, देविका नाडिग, डॉ. शोभा जोशी आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. शेट्टी यांनी दृकश्राव्य सादरीकरणाच्या माध्यमातून ‘सिग्निफिकन्स ऑफ मेंटल अॅंड इमोशनल वेलबिईंग ऑफ चिल्ड्रेन अॅंड अॅडोलेसन्स अॅंड इट्स इम्पॅक्ट ऑन अॅडल्टहूड’ या विषयावर आपले विचार मांडले. स्वतःवरचा विश्वास मुलांमध्ये निर्माण करणे महत्त्वाचे असून, मुलांमध्ये कोवळ्या वयात दिसून येणारी हिंसेची किंवा गुंडगिरीची लक्षणे, आक्रमकता, गॅजेट्सवरील अवलंबित्व, एकाग्रता नसणे असे धोके त्यांच्यातील आत्मविश्वास जागविल्यास कमी करता येतात. मुलांसह एकत्र वेळ घालवणे, कौटुंबिक उपक्रम सुरू ठेवणे, क्वालिटी टाईम देणे, मुलांवर पहारे न देता पालकत्वाच्या भूमिकेने दृष्टी ठेवणे महत्त्वाचे आहे. पालकांसह शिक्षकांनी हे लक्षात ठेवल्यास सर्वच वयोगटांतील विद्यार्थ्यांचा प्रवास जेलसीकडून जॉयफुलनेसकडे होईल, असे डॉ शेट्टी म्हणाले.
डॉ. मोहन आगाशे यांनी ‘नर्चरिंग मेंटल हेल्थ इन अ डिजिटल एज – मॅनेजिंग टेक्नॉलॉजी अॅंड मेंटल वेलबिईंग’, या विषयावर बोलताना सध्या माहितीचा भडिमार आहे पण अनुभवांची वानवा असल्याचे निरीक्षण नोंदवले. डॉ. आगाशे म्हणाले, आपल्या धोरणकर्त्यांनी सर्वसाधारण पद्धतीची औपचारिक शिक्षणाची रीत रूढ केली आहे. प्रत्येक मूल स्वतंत्र, वेगळे आणि अनेक शक्यता निर्माण करणारे असते, या मूलभूत घटकाचा त्यात फारसा विचार झालेला नाही. तो विचार झाला पाहिजे आणि त्यासाठी विचार आणि भावना तसेच आजच्या डिजिटल युगात वास्तव आणि आभासी विश्व, यांच्यातील विवेकी स्वरुपाचा समतोल अत्यावश्यक आहे.