Employee pours petrol on himself at Vishrantwadi police station; Police employee suspended | पुण्यात पोलिसाचा धक्कादायक प्रकार: विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्याने स्वतःवर ओतले पेट्रोल; पोलिस कर्मचारीचे निलंबन – Pune News

.

पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असतानाच, आता एका पाेलिस कर्मचाऱ्याने विश्रांतवाडी पाेलिस ठाण्याचे आवारात स्वत:चे बुलेट गाडीतील पेट्राेल एका कॅन मध्ये काढून आणत, स्वत:चे अंगावर ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडल्याने गाेंधळ उडाल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पाेलिस शिपाई विजय लक्ष्मण जाधव याच्यावर वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केल्याबद्दलचा ठपका ठेवत त्याचेवर निलंबन कारवाई केली आहे.

याप्रकरणी विश्रांतवाडी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाेलिसांचा नियंत्रण कक्ष असलेल्या डायल ११२वर धानाेरी परिसरात सहयाद्री काॅलनी येथे भांडणे झाल्याचा फाेन आला हाेता. त्यानुसार विश्रांतवाडी पाेलिस ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक एस माने हे घटनास्थळी गेले हाेते. त्यावेळी सदर ठिकाणी पाेलिस मुख्यालयात नेमणुकीस असलेले पाेलिस शिपाई विजय जाधव व त्यांचा भाऊ विकी लक्ष्मण जाधव व इतर असे सर्वजण ओंकार गुलचंद सिंग हे राहते घराचे परिसरात व्यवसाय करत असलेल्या डुकरे पाळण्याच्या हद्दीवरुन त्यांच्यात वाद सुरु हाेते. त्यावरुन सदर दाेन्ही बाजूच्या लाेकांना विश्रांतवाडी पाेलीस स्टेशन येथे आणण्यात आले. त्यावेळी पाेलिस स्टेशन मध्ये याबाबत चाैकशी केली जात असताना पाेलिस कर्मचारी विजय जाधव याने पाेलिस स्टेशनचे बाहेर जाऊन स्वत:चे बुलेट गाडीतील पेट्राेल एका कॅन मध्ये आणले व स्वत:चे अंगावर ते टाकून अारडाअाेरड सुरु केल्याने गडबड उडाली. यावेळी पाेलीस स्टेशन मध्ये हजर असलेल्या अधिकारी व पाेलीस अंमलदार यांनी तात्काळ त्यास ताब्यात घेत यासंर्दभातील माहिती वरिष्ठ पाेलीस अधिकाऱ्यांना दिली. चाैकशी दरम्यान पाेलीस शिपाई विजय जाधव याने गैरवर्तन केल्याचे सिध्द झाल्याने त्याचेवर निलंबन कारवाई करण्यात अाल्याची माहिती पाेलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली अाहे. याबाबत पुढील तपास विश्रांतवाडी पाेलीस करत अाहे.

Leave a Comment