Fake soldier cheats youth of lakhs of rupees for army recruitment; Accused arrested in Pune | लष्करी गुप्तचर यंत्रणेची कारवाई: बोगस जवानाने तरुणांकडून लष्कर भरतीसाठी लाखो रुपयांची फसवणूक; आरोपी पुण्यात अटक – Pune News

पुणे शहरात लष्करात भरती करण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या एका तोतया जवानाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेने ही गोपनीय कारवाई करत, तोतया जवानला पकडून बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीने महाराष्ट्रासह कर्नाटकातील

.

नितीन बालाजी सूर्यवंशी (रा. हेळंब, ता. देवणी, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत भरत रमेश महाटे (वय २३, रा. नागराळ, ता. मुखेड, जि. नांदेड) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. महाटे सध्या हडपसर भागात राहण्यास असून महाटे याला लष्करात भरतीचे आमिष दाखवून आरोपी सूर्यवंशीने जाळ्यात ओढले. सूर्यवंशी हा १३ ऑगस्ट २०२४ रोजी महाटे याला उदगीर रेल्वे स्थानकात भेटलेला होता. महाटे शेती करत असून त्यावेळी त्यांची ओळख निर्माण झाली. आरोपी सूर्यवंशीने लष्करात जवान असल्यचाी खोटी माहिती त्याला दिली. लष्कर, पोलीस दलात भरतीचे आमिष दाखविले. त्यानंतर दोघेजण एकमेकांच्या वारंवार संपर्कात आले. आरोपीने महाटे यांच्याकडून एक लाख ७५ हजार रूपये घेतले. त्यानंतर १७ ऑगस्ट २०२४ रोजी त्याला पुण्यातील लष्कराच्या दक्षिण मुख्यालय परिसरात भेटण्यासाठी बोलावले. त्यावेळी सूर्यवंशी लष्करी जवानासारखा गणवेश परिधान करून आलेला होता.

त्यानंंतर महाटेने लष्कर भरतीबाबत विचारणा केली असता, महाटेने आरोपीला १९ जानेवारी रोजी आणखी रक्कम मागून घेतली. महाटेकडून त्याने वेळोवेळी तीन लाख रुपये घेतले. मार्च महिन्यात भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची खोटी माहिती दिली. महाटेने त्याच्याशी संपर्क साधला असता सूर्यवंशीने त्याला प्रतिसाद दिलाा नाही. याबाबतची माहिती लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली. त्यानंतर सापळा लावून सूर्यवंशीला ताब्यात घेण्यात आले. सूर्यवंशीने महाराष्ट्रासह कर्नाटकातील तरुणांची फसवणूक केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. बंडगार्डन पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

Leave a Comment