राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी पुरेसा वेळ देता येत नसल्याचा दाखला दिला आहे. पण मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा तथा रायगड व नाशिकच्या पालक
.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांत वाद सुरू आहे. नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपला, तर रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले होते. पण या दोन्ही जागांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दावा सांगितला आहे. यामुळे या दोन्ही ठिकाणच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली आहे. गत एक ते दीड महिन्यांपासून यावर कोणतेही राजकीय औषध सापडले नाही. त्यातच संतोष देशमुख हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना आपल्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे वैद्यकीय शिक्षण हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याची घोषणा केली आहे. हसन मुश्रीफ हे कोल्हापूरचे आहेत. कोल्हापूर पासूनचे वाशिमचे अंतर खूप जास्त आहे. यामुळे त्यांना आपल्या मतदारसंघासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. परिणामी त्यांनी वाशिमचे पालकमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचा संबंध नाशिक व रायगडच्या वादाशी जोडला जात आहे. याविषयी राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
दत्ता भरणेंना मिळणार जबाबदारी?
हसन मुश्रीफ यांनी हा निर्णय घेताना उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनाही विश्वासात घेतले आहे. त्यांनी वाशिमचे पालकमंत्रिपद सोडल्यामुळे आता हे पद कुणाला मिळणार? याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे सध्या कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नाही. त्यामुळे आता वाशिमचे पालकमंत्रिपद त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. याशिवाय महायुतीमधील पालकमंत्रिपदाचा वाद सोडवण्यासाठी तजवीज म्हणूनही या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वापर केला जाऊ शकतो.
हे ही वाचा…
महायुती सरकारचा मोठा निर्णय:प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ, महसूलमंत्र्यांची घोषणा; विद्यार्थ्यांना दिलासा
मुंबई – महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे मुद्रांक शुल्क माफ केल्याने विद्यार्थ्यांचा आर्थिक ताण आता हलका होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा केली. वाचा सविस्तर