गेल्या काही दिवसांपासून राज्यात वातावरणात मोठा बदल होऊन उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. मुंबईसह कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या पाच वर्षांनंतर (म्ह
.
राज्यात अनेक जिल्ह्यांत तापमानाने फेब्रुवारीतच पस्तिशी ओलांडली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचे चटके बसत आहेत. पुढील दोन दिवसात मुंबई, ठाणे, रायगड पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे. मुंबईत ३८ अंश सेल्सियस तापमानापर्यंतची नोंद झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. इतर ठिकाणी हवामान कोरडे राहील. पश्चिम महाराष्ट्रात तापमानात वाढ झाली आहे.
मुंबईत यापूर्वीचे तापमान : २०२० मध्ये ३८.४ अंश , २०१९ मध्ये ३६.३, २०१८ मध्ये ३७.८, २०१८ मध्ये ३७.८ तर २०१७ मध्ये ३८.८ अंश नोंद हाेती.

पूर्वेचे वारे आले, पश्चिमेकडून मात्र थांबल्याने तापमान वाढ
या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अनेक शहरांत तापमान ३७ अंशांपेक्षा जास्त झाले आहे. हा रेकॉर्ड आहे का? हे नवीन नाही. फेब्रुवारी महिन्यात अनेक वेळा ३७ अंशपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. फेब्रुवारीतच तापमान वाढण्याचे कारण काय आहे? फेब्रुवारी महिन्यात जेव्हा हिवाळ्याचे वातावरण बदलून उन्हाळ्याचे वेध लागतात तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते. पूर्वेकडून वारे येतात, त्यामुळे दोन ते तीन दिवस उष्णता वाढते. आणि नंतर पुन्हा कमी होते. असे हवामानाचे चक्र सुरूच असते. तापमान वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे पश्चिम समुद्राकडून येणारे वारे मिळत नाहीत आणि पूर्वेकडून वारे येत आहेत. तापमान वाढ किती दिवस राहील? ही उष्णतेची लाट फक्त दोन ते तीन दिवसांसाठी आहे. याचा अर्थ लगेच तापमानात मोठी वाढ होणार आहे असे नाही. त्यानंतर तापमान कमीही हाेईल. यापूर्वी फेब्रुवारीत तापमान ३७ अंशांवर कधी हाेते? यापूर्वी २०१० आणि २०२० मध्येही फेब्रुवारीत तापमान ३७ अंशांपेक्षा जास्त झाले होते.
सुनील कांबळे, प्रमुख, प्रादेशिक हवामान केंद्र (मुंबई)
कधी, कुठे यलो अलर्ट
मुंबई : २६, २७ फेब्रुवारी ठाणे : २६, २७ आणि २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रायगड : २६, २७ फेब्रुवारी आणि १ मार्च रत्नागिरी : २६ २७ फेब्रुवारी सिंधुदुर्ग : २६ फेब्रु. पालघर : २६ फेब्रु.
काळजी घ्या : उन्हापासून बचाव करा, तब्येत सांभाळा
मुंबई, पुण्यासह काही शहरांमध्ये सकाळी आणि रात्रीच्या वेळी थंडी तर दुपारच्या वेळेस घामाच्या धारा सहन कराव्या लागत आहेत. वातावरणा बदलामुळे नागरिक हैराण आहेत. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये तापमानवाढ कायम राहील, असा इशारा असल्याने नागरिकांनी कडक उन्हापासून स्वत:चा बचाव करावा. आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही हवामान विभागाने केले आहे.